एक्स्प्लोर

Pusad Assembly Election:  पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?

Pusad Vidhan Sabha election : पुसद विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शरद मेंद रिंगणात आहेत. 

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात विधानसभेचे 7 मतदारसंघ आहेत. जिल्ह्यात यवतमाळ, राळेगाव, वणी, आर्णी,पुसद, दिग्रस आणि उमरखेड हे मतदारसंघ आहेत. पुसद विधानसभा मतदारसंघावर नाईक कुटुंबाचं वर्चस्व राहिलेलं आहे. महायुतीमध्ये ही जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात आली आहे. तर, महाविकास आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडे आहे. अजित पवार यांनी विद्यमान आमदार इंद्रनील नाईक यांना संधी दिली आहे. तर, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं शरद मेंद यांना उमेदवारी दिली आहे. या ठिकाणी ययाती नाईक यांचं नाव देखील चर्चेत होतं.

पुसदमध्ये दोन्ही राष्ट्रवादीमध्ये लढत

2019 च्या विधानसभा निवडणुकीत यवतमाळ जिल्ह्यातील 7 जागांपैकी 6 जागा महायुतीला मिळाल्या होत्या. भाजपनं 5 आणि शिवसेनेनं एका जागेवर विजय मिळवला होता. केवळ एका मतदारसंघात काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळालं होतं. पुसद मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे इंद्रनील नाईक विजयी झाले होते. इंद्रनील नाईक यांनी 2019 ला  भाजपच्या निलय नाईक यांचा पराभव केला होता. यावेळी मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दोन्ही गट आमने सामने आले आहेत. 

लोकसभेला पुसदमध्ये काय घडलं?

यवतमाळ जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ तीन लोकसभा मतदारसंघात विभागले गेले आहेत. चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम आणि हिंगोली या लोकसभा मतदारसंघात सात विधानसभा मतदारसंघ विभागलेले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील मतदारांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता. सात पैकी सहा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आघाडी दिली होती. केवळ पुसद मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवारला आघाडी मिळाली होती. पुसद विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या राजश्री पाटील यांना आघाडी मिळाली होती. तर, संजय देशमुख या मतदारसंघात पिछाडीवर राहिले होते.  राजश्री पाटील यांना 79984 मतं मिळाली होती. तर,संजय देशमुख यांना 76786 मतं मिळाली आहेत. 

पुसदमध्ये यंदा कोण बाजी मारणार?

पुसद विधानसभा मतदारसंघात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत इंद्रनील नाईक यांनी लढत दिली होती. इंद्रनील नाईक यांना त्यावेळी  89143 मतं मिळाली होती. तर, निलय नाईक यांना 79442 मतं मिळाली होती. अपक्ष उमेदवार ज्ञानेश्वर बेळे यांना 11255 मतं मिळाली होती. यावेळी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असल्यानं महायुतीकडून इंद्रनील नाईक रिंगणात आहेत. विरोधात शरद मेंद निवडणूक लढवत आहेत. पुसदचे मतदार कुणाला कौल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. 

इतर बातम्या : 

विधानसभेची खडाजंगी : यवतमाळमध्ये 2019 ला भाजप सेनेचं वर्चस्व, 2024 च्या लोकसभेला मविआची सरशी, विधानसभा निवडणुकीत काय होणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vidhansabha Election Result 2024 : पडद्यामागे गुप्त हालचाली, मविआतील एक पक्ष फुटणार; अजितदादांच्या खास व्यक्तीचा खळबळजनक दावा
पडद्यामागे गुप्त हालचाली, मविआतील एक पक्ष फुटणार; अजितदादांच्या खास व्यक्तीचा खळबळजनक दावा
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
Sanjay Raut : संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Vidhansabha Election :  पुणेकरांना उत्सुकता; कुणाची सत्ता स्थापन होणार ?Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM : 22 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaSanjay Raut Mumbai : त्या सर्व्हेची ऐसी की तैसी, 160 जागा आम्ही जिंकणारच! राऊतांचा हल्लाबोल#abpमाझाRajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्ती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidhansabha Election Result 2024 : पडद्यामागे गुप्त हालचाली, मविआतील एक पक्ष फुटणार; अजितदादांच्या खास व्यक्तीचा खळबळजनक दावा
पडद्यामागे गुप्त हालचाली, मविआतील एक पक्ष फुटणार; अजितदादांच्या खास व्यक्तीचा खळबळजनक दावा
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
Sanjay Raut : संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
Ind vs Aus 1st Test : गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
Embed widget