Lok Sabha 2024 : शेवटच्या दिवशी सर्व नेत्यांकडून प्रचाराचा जोर, 11 मतदारसंघासाठी 7 तारखेला मतदान
Lok Sabha 2024 देशभरात लोकसभा निवडणूक ऐन रंगात आलीय. महाराष्ट्रातही आज तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकांसाठी अनेक नेत्यांचा वेगवेगळ्या भागात प्रचारांचा धडाका पाहायला मिळाला..महाराष्ट्रात उद्या तिसऱ्या टप्प्यासाठी ११ मतदारसंघात मतदान पार पडणार आहे.. रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले अशा ११ मतदारसंघात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेय..लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून महायुती आणि मविआच्या दिग्गज नेत्यांनी अकराही मतदारसंघात प्रचाराचा धुरळा उडवला होता..पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनीसुद्धा आपल्या उमेदवारांसाठी सभांचा धडाका लावला होता तर मविआच्या उमेदवारांसाठी राहुल गांधी, प्रियंका गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवारांनी प्रचाराचा जोर लावला होता.. आज अखेर प्रचाराच्या तोफा थंडावल्यात. सात तारखेला मतदान पार पडणार आहे, त्यामुळे आता मतदारराजा कोणाच्या पारड्यात मत टाकतोय, हे पाहावं लागणार..