Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Nashik West Constituency : सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली आणि नंतर त्याचे रुपांतर हाणामारीत झाल्याचं नाशिकमध्ये दिसून आलं. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
नाशिक : शहरातील पश्चिम विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटात आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये राडा झाल्याचं दिसून आलं. ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रचाराच्या स्लिप वाटत प्रचार सुरू होता. मात्र ठाकरेंच्या शिवसेनेकडून पैसे वाटप असल्याचा संशय भाजप पदाधिकाऱ्यांना आला. त्यावरून दोन्ही पक्षाचे पदाधिकारी समोरासमोर आल्याने बाचाबाची झाली. शाब्दिक बाचाबाचीनंतर थेट या दोन्ही गटाककडून तुफान हाणामारी झाली. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
असाच प्रकार गुरूवारी नाशिकच्या पूर्व विधानसभा मतदारसंघात घडलेला होता. तर आज हा वाद भाजप आणि महाविकास आघाडीच्या संदर्भात पुन्हा पाहायला मिळाला. नाशिक पश्चिमचा वाद मात्र थेट नाशिकच्या अंबड पोलिस ठाण्याच्या आवारात घडल्याने शहरातील कायदा व व्यवस्थेच्या प्रश्नावर अनेक प्रश्न आता उपस्थित होऊ लागली आहे.
नेमकं काय घडलं?
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपकडून सीमा हिरे तर ठाकरे गटाकडून सुधाकर बडगुजर हे उमेदवार आहेत. मतदानाचा शेवटचा टप्पा घेत असताना सर्वच उमेदवारांकडून प्रचारात आघाडी पाहायला मिळत आहे. मात्र यावेळी भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेली तुफान हाणामारी झाली.
हा वाद इतका टोकाला गेला आणि या ठिकाणी भाजप आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये गदारोळ झाला. तात्काळ पोलिसांनी हस्तक्षेप करून संपूर्ण परिस्थिती आटोक्यात आणली. यावेळी बंदुकीतून फायरिंग तसेच धारदार शास्त्राने वार करण्यात आल्याची तक्रार दोन्ही गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना दिली.
पंकजा मुंडे थेट पोलीस ठाण्यात
सीमा हिरे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची देखील सभा आयोजित करण्यात आली होती. पंकजा मुंडे या तब्बल दोन तास उशिरा आल्या. या वादाच्या दरम्यान त्या देखील नाशिक शहरात दाखल झाल्या. पंकजा मुंडे यांनी सभास्थळ न जाता थेट अंबड पोलीस ठाणे गाठले. नाशिक शहर पोलीस आयुक्त देखील अंबड पोलीस ठाण्यात दाखल झाले होते.
पंकजा मुंडे आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याशी चर्चा केली. या चर्चेच्या दरम्यान पोलिसांकडून न्यायाची अपेक्षा आहे, असे राजकारण निवडणुकीत करणे हे निंदनीय आहे अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली. सीमा हिरे यांनी देखील या संदर्भात संपूर्ण घडलेली घटना सांगत पोलीस तपास करून योग्य ती कारवाई करतील अशी प्रतिक्रिया दिली.
यासंदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये काय झाले हे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी सांगितल. तर पोलिसांनी नि:पक्षपणे कारवाई करावी अशी त्यांनी मागणी केली.
या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आणि गुन्हा नोंद केला. सीसीटीव्हीच्या आधारे ओळख पटल्यानंतर एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले.
ही बातमी वाचा: