Sarfaraz Ahmed : ...तर मुस्लिम भाजप-शिवसेनेच्या बाजूने उभे राहतील :सरफराज अहमद
Sarfaraz Ahmed : ...तर मुस्लिम भाजप-शिवसेनेच्या बाजूने उभे राहतील :सरफराज अहमद
विधानसभा निवडणुकीत प्रचार शिगेला पोहोचलेला असताना मुस्लिम धर्मगुरू मौलाना सज्जाद नौमानी यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलंय. तर जवळपास 17 जागावर महाविकास आघाडी व्यतरिक्त अन्य उमेदवारांना पाठिंबा दिलाय. लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात थेट भूमिका घेतली होती. तशीच स्थिती विधानसभा निवडणुकीत राहील का हा प्रश्न सध्या उपस्थित होतोय. सोलापुरातील मुस्लिम प्रश्नांचे अभ्यासक सरफराज अहमद यांनी मौलाना सज्जाद नौमानी यांच्या भूमिकेला उघडपणे विरोध केलंय. “मौलाना सज्जाद नौमानी यांना महाराष्ट्रचे राजकारण समजलेले दिसतं नाहीये. लोकसभा निवडणुकीत ब्लॅक अँड व्हाईट अशीच स्थिती होती मात्र विधानसभा निवडणुकीत स्थानिक स्थिती महत्वाची असते. त्यामुळे मुस्लिम समाज हा सज्जाद नौमानी यांच्या पाठीशी न जाता स्थानिक पातळीवर उमेदवार पाहून मतदान करेल. काही ठिकाणी तर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या सोबत देखील मुस्लिम दिसतायत.“ असे मतं मुस्लिम अभ्यासक सरफराज अहमद यांनी व्यक्त केलं. त्यांच्याशी संवाद साधलाय आफताब शेख यांनी