एक्स्प्लोर
फक्त 5 स्टॉक्स, 15 दिवसांची प्रतीक्षा अन् पैशांची बससात, 'इथं' गुंतवणूक केल्यास तुम्ही होणार मालामाल?
सध्या शेअर बाजारात चढ उतार पाहायला मिळत आहे. अशा स्थितीत योग्य काळजी घेऊनच गुंतवणूक करायला हवी. अन्यथा मोठा आर्थिक फटका बसू शकतो.

best five stock to invest (फोटो सौजन्य- META AI)
1/7

Stocks to BUY: अॅक्सिस डायरेक्ट आणि शेयरखान या ब्रोकरेज हाउसेसने आगामी 15 दिवसांसाठी गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम 5 स्टॉक्स सूचवले आहेत.
2/7

या ब्रोकरेज हाऊसेसच्या म्हणण्यानुसार Global Health या शेअरमध्ये गुंतवणूक करायला हरकत नाही. सध्या हा शेअर 1072 रुपयांवर आहे. हा शेअर 1049-1059 रुपयांपर्यंत घसरल्यास त्यात गुंतवणूक करावी. त्यासाठी 1146 रुपयांचे टार्गेट तर 1030 रुपयांचा स्टॉपलॉस लावावा.
3/7

Pitti Engineering या कंपनीचा शेअर सध्या 1303 रुपयांवर आहे. या स्टॉकला 1296-1309 रुपयांच्या रेंजमध्ये खरेदी करावे. तसेच 1430 रुपयांचे टार्गेट तर 1275 रुपयांचा स्टॉपलॉस लावावा.
4/7

Hero Motocorp हा शेअर सध्या 4604 रुपयांवर आहे. या स्टॉकमध्ये 4500-4549 रुपयांच्या रेंजमध्ये गुंतवणूक करावी. त्यासाठी 4744 रुपयांचे टार्गेट तर 4484 रुपयांचा स्टॉपलॉस लावावा.
5/7

शेयरखानने पोजिशनल आधारावर Oberoi Realty या कंपनीचे शेअर 1930-1950 रुपयांच्या रेंजमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी 1840 रुपयांच्या स्टॉपलॉससह 2040 आणि 2100 रुपयांचे टार्गेट दिले आहे.
6/7

शेयरखानने पोजिशनल आधारावर Tech Mahindra या कंपनीचे शेअर 1677-1697 रुपयांच्या रेंजमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तर 1615 रुपयांच्या स्टॉपलॉससह 1740 रुपयांचे पहिले तर 1785 रुपयांचे दुसरे टार्गेट दिलेले आहे.
7/7

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 15 Nov 2024 03:33 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
नाशिक
भारत
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
