Amol Kolhe on Ajit Pawar : चुकीला क्षमा पण गद्दारीला माफी नाही, अमोल कोल्हे अजितदादांवर बरसले
Amol Kolhe on Ajit Pawar : चुकीला क्षमा पण गद्दारीला माफी नाही, अमोल कोल्हे अजितदादांवर बरसले
- चुकीला क्षमा होऊ शकते मात्र गद्दारीला माफी नाही .. अजितदादा इतके दिग्गज नेते असूनही त्यांना गावोगावी भावनिक आवाहन करीत फिरावे लागत आहे , त्यांना जनतेचा मूड नक्की कळलेला आहे यंदा पक्ष फोडणारे आणि चिन्हे पळवणाऱ्याना जनता माफ करणार नाही .. राज्यात महा विकास आघाडीचे सरकार येईल अशी टोलेबाजी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केली. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अनिल दादा सावंत यांच्या प्रचारासाठी आले असता कोल्हे माध्यमांशी बोलत होते.
नुकत्याच आलेल्या सर्वे वर जोरदार टोलेबाजी करताना सर्वे करणारी कंपनी ही अदानी यांची असून ते सध्या भाजपाला खुश करायचं काम करत आहेत . मात्र इतकी करूनही त्यांना 145 ते 165 एवढ्या जागा दाखवाव्या लागत आहेत . भाजपाला खुश करण्यासाठी कितीही रेटलं तरी त्यांना काठावरच्या बहुमताच्या पुढे जाता येत नसल्याचे सर्वे सुद्धा दाखवत आहेत. यामुळे केवळ काठावरचे मतदार जे आहेत त्यांना भ्रमित करण्यासाठी किंवा दिशाभूल करण्यासाठी असे सर्व दिले जात आहेत. ही कंपनी पूर्वी अनिल अंबानी यांची होती नंतर ती अडाणी यांनी विकत घेतली. हजारो कोटीचे गुंतवणूक असणाऱ्या उद्योगपतींना आपला इंटरेस्ट साध्य करण्यासाठी असे करावे लागते . मात्र महाराष्ट्राने आपलं मत पक्क केला असून आता कोणत्याही परिस्थितीत महायुती सत्तेत येणार नाही असा टोलाही अमोल कोल्हे यांनी लगावला.
हेलिकॉप्टर मधून आल्यावर माझीही बॅग तपासली होती पण त्यात काय निघणार प्रामाणिकपणा आणि निष्ठा असे सांगत आम्ही काय सुरत गोवाहाटी फिरलेलो नाही त्यामुळे जरी कायद्याने ही तपासणी आवश्यक असली तरी पंतप्रधान अमित शहा मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांच्या कधी बॅगा तपासल्याचे ऐकिवात नसल्याचाही टोला खासदार कोल्हे यांनी लगावला.
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गट संपूर्ण ताकद अनिल सावंत यांच्या मागे उभी करत असून ज्या खोट्या अफवा पसरवल्या जात आहेत या संपूर्ण बेसलेस असल्याचे ठणकावून सांगितले. काँग्रेसनी दिल्लीला उमेदवार काही दिवसापूर्वी बीआरएसच्या विमानातून जाताना आम्ही पाहिला होता नंतर कुठे कुठे फिरून परत आलेला दिसतोय असा टोला भगीरथ भालके यांना लगावताना तो नक्की काँग्रेसचा तरी आहे का याची खात्री काँग्रेस वाल्यांनी करून घ्यावी असाही टोला लगावला. राष्ट्रवादीच्या उमेदवाराला गिनतीत नसल्याची टीका करणाऱ्या खासदार प्रणिती शिंदे यांनाही टोलेला गावत असं बोलताना त्यांनी वरिष्ठांशी चर्चा केलेली दिसत नाही असे डॉक्टर कोल्हे यांनी सांगितलं,