(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Alibag Thackery Home : Rashmi Thackeray आणि मनीषा वायकर यांनी घेतलेल्या जागेत 19 बंगले असल्याचा आरोप
रायगडच्या कोर्लई गावात रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांनी घेतलेल्या जागेत १९ बंगले असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला असला, तरी प्रत्यक्षात या जागेवर सध्या एकही बंगला नाही. गेले काही दिवस सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर एबीपी माझानं कोर्लई गावात जाऊन पडताळणी केली. आणि सरपंच प्रशांत मिसाळ यांच्याशी संवाद साधला. तेव्हा या जागेवर पूर्वी झापाच्या झोपड्या होत्या, असं सरपंचांनी सांगितलं. अन्वय नाईक यांनी ही जमीन खरेदी केल्यानंतर त्या झोपड्या पाडल्या. त्यानंतर ही जमीन त्यांनी रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांना विकली, अशी माहितीही त्यांनी दिली. पूर्वी तिथं झापाच्या झोपड्या असल्यानं रश्मी ठाकरे यांनी घरपट्टी भरली अशी माहिती सरपंच प्रशांत मिसाळ यांनी दिली. रश्मी ठाकरे यांनी ग्रामपंचायतीची माफी मागितली हा किरीट सोमय्या यांनी केलेला दावाही सरपंचांनी फेटाळला. रश्मी ठाकरे यांनी कधीच माफी मागितली नाही किंवा कधीही ग्रामपंचायतीशी संपर्क साधला नाही, असं सरपंच मिसाळ यांनी सांगितलं.