Top 100 Headlines : टॉप शंभर बातम्या : 6.30 AM : 05 March 2025 : ABP Majha
Top 100 Headlines : टॉप शंभर बातम्या : 6.30 AM : 05 March 2025 : ABP Majha
चॅम्पियन्स ट्रॉफिच्या फायनलमध्ये टीम इंडियाची धडक.. सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियावर ४ विकेट्सनी मात.. विराट कोहलीची निर्णायक खेळी
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकी आणि मंत्रिपदाचा फैसला आज.. कोकाटेंच्या दोषी असण्याला स्थगिती मिळणार की निकाल कायम याचा आज निर्णय
संतोष देशमुख हत्याप्रकरणी धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा...मुंडेंना कार्यमुक्त केल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा...रात्रीच राजीनाम्याचा निर्णय झाल्याच्या एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब...
राजीनामा द्या, नाहीतर राज्यपालांना पत्र लिहून हकालपट्टी करावी लागेल...
राजीनाम्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या मुंडेंना फडणवीसांनी तंबी दिल्याची सूत्रांची माहिती...
मुंडेंचा राजीनामा नैतिकतेच्या मुद्यावरुन, राष्ट्रवादी काँग्रेसची माहिती...तर वैद्यकीय कारणावरून राजीनामा, स्वतः धनंजय मुंडेचा ट्वीटद्वारे दावा... नैतिकतेवरून विरोधकांचा हल्लाबोल...
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचं नेमकं ((खरं)) कारण काय?, तसंच दोन महिन्यांनी अधिवेशनाच्या काळातच या गोष्टी बाहेर कशा आल्या?, उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल


















