ABP Majha Headlines : 07 AM : 31 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
मस्साजोगच्या सरपंच हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ सर्व ग्रामपंचायतींचं ३ दिवस कामबंद आंदोलन, नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशीही राहणार कामकाज बंद
सरपंच हत्या प्रकरणात सीआयडी अॅक्शन मोडवर..फरार चार आरोपींची खाती गोठवण्यासंदर्भात १३ बँकांना पत्र तर वाल्मिक कराडशी संबंधित महिलेची आजही चौकशी
प्राजक्ता माळीबाबत केलेल्या वक्तव्याबाबत भाजप आमदार सुरेश धसांकडून दिलगिरी व्यक्त...प्राजक्ताताईंचा अपमान करायचा नव्हता, धस यांची स्पष्टोक्ती...
दोन हजार रुपयांच्या नोटा रिझर्व बँक ऑफ इंडियातून बदलणाऱ्या रॅकेटचा नागपुरात भांडाफोड, चार आरोपींना अटक, २ लाख ६७ हजार रुपये जप्त
बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी प्रकरणी अटकेतील आरोपी नितीन सप्रेचा मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप, पोलिसांनी जबरदस्तीने जबाब नोंदवल्याचा कोर्टात दावा
जालन्यामध्ये क्रिकेट खेळताना ३२ वर्षीय खेळाडूचा हृदयविकारानं मृत्यु, षटकार ठोकताच खेळाडू मैदानावर कोसळला..
नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई सज्ज, रेस्टॉरंट, पब पहाटे पाचपर्यंत खुले, लोकलच्या तीनही मार्गावर विशेष फेऱ्या, बेस्टच्या अतिरिक्त बस, तर शहरभर पोलिसांचा तगडा बंदोबस्त