(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lok Sabha Election Result 2024 : महानिकालाच्या बातम्यांचा वेगवान आढावा : 05 जून 2024 एबीपी माझा
सरकारमधून मोकळं करा, लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवीसांची पक्ष नेतृत्त्वाला विनंती
देवेंद्र फडणवीसांनी सरकारमध्ये राहूनच संघटनेचं काम करावं, आगामी काळात फडणवीसांच्या नेतृत्वात चांगलं यश मिळेल, फडणवीसांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर बावनकुळेंची प्रतिक्रिया
राज्यात पराभवाची जबाबदारी सामुहिक, फडणवीसांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया, टीम म्हणून काम केलं, यापुढेही करणार असल्याचं वक्तव्य
सर्वेंच्या नावाखाली लोकसभेच्या जागा बदलल्यामुळे फटका बसला... निकालानंतर शिंदेंच्या शिवसेनेची नाराजी..
बारामतीतल्या दारूण पराभवानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची नाराजी उघड,
भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची मतं मिळाली नसल्याचा अमोल मिटकरींचा आरोप, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवरही स्तुतीसुमनं
राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी नरेंद्र मोदींचा पंतप्रधानपदाचा राजीनामा स्वीकारला, १७ वी लोकसभा भंग.
8 जूनला नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता.... तर मोदी आजच सत्तास्थापनेचा दावा करणार असल्याची माहिती
नवं सरकार स्थापन करण्यासाठी आता चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार ठरणार किंगमेकर...जादुई आकडा गाठण्यासाठी भाजपला दोघांकडील २८ जागांची गरज...
लोकसभा निवडणूक निकालानंतर राजकीय हालचालींना वेग, नितीशकुमार आणि तेजस्वी यादव एकत्र दिल्लीला, भाजपची धाकधूक वाढली
पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा, त्यांचा ब्रँड संपलाय, खासदार संजय राऊतांची मागणी, सत्तास्थापनेसाठी इंडिया आघाडी प्रयत्न करेल,
राऊतांचं एबीपी माझावर एक्स्लुझिव्ह वक्तव्य
दिल्लीत आज एनडीएची बैठक... एनडीएतील घटक पक्षाच्या बैठकीला अजित पवार गैरहजर तर... मुख्यमंत्र्यासह प्रफुल्ल पटेल बैठकीला जाणार