Gram Panchayat Election : अण्णा हजारेंच्या राळेगणसिद्धीत निवडणुकीची रणधुमाळी, पाहा खास रिपोर्ट
राज्यातील जनतेचे लक्ष लागून असलेल्या 14 हजार गावांमध्ये राजकीय धुरळा उडणार आहे. या निवडणुकांसाठी गावागावात जोरदार प्रचार सुरुय. मात्र यावेळी राज्यातील तीन चर्चित गावात देखील निवडणूक होत असल्यानं या गावांच्या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. मागच्या तीस वर्षापासून बिनविरोध निवडणूक होत असलेल्या हिवरेबाजारमध्ये पहिल्यांदाच निवडणूक होणार आहे तर अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धीमध्ये सुद्धा ग्रामपंचायत निवडणूक होणार आहे आणि भास्कर पेरे पाटील यांच्या पाटोदा ग्रामपंचायत निवडणुकीत आता पेरे पाटील नसणार आहेत.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगण-सिद्धीतील विकासाचे काम पाहायला आजही या गावात लोक दुरुन येतात. इथल्या विकासाचा रोल मॉडेल राज्यभर पसरलं. मात्र आता त्याच राळेगण सिद्धीमध्ये निवडणुकीची धामधूम पाहायला मिळतेय. 9 जागांपैकी केवळ 2 जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित 7 जागांवर यंदा निवडणूक होणार आहे.