Dhananjay Deshmukh : कराडच्या शरणागतीनंतर मस्साजोगमध्ये भीतीचं वातावरण? देशमुख काय म्हणाले?
Dhananjay Deshmukh : कराडच्या शरणागतीनंतर मस्साजोगमध्ये भीतीचं वातावरण? देशमुख काय म्हणाले?
बीड जिल्ह्यातील सरपंच हत्याप्रकरणावरुन राज्यातील वातावरण तापलं असून देशमुख कुटुंबीयांच्या न्यायासाठी सर्वच वर्गातून मागणी केली जात आहे. राज्य सरकारनेही आदेश दिल्यानंतर सीआयडीकडून गतीने तपा सुरू आहे. त्यातच, आज बीडमधील खंडणी प्रकरणातील आरोपी आणि संतोष देशमुख प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप असलेल्या वाल्मिक कराडने (Walmik karad) आज सीआयडी पोलिसांसमोर शरणागती पत्करली असून सीआयडीने त्याला अटकही केली आहे. पुणे सीआयडी कार्यालयात वाल्मिक कराडची प्राथमिक चौकशी केल्यानंतर पुढील तपासणीसाठी बीड सीआयडीचे डीवायसी आहेत, जे या गुन्ह्याचा तपास करतात त्यांच्याकडे कराडची रवानगी करण्यात आली आहे. या अटकेनंतर प्रथमच सीआयडीचे (CID) पोलीस उपमहानिरीक्षक सारंग आव्हाड यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
वाल्मिक कराड पोलिसांना शरण आल्यानंतर पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत आहे. तसेच, मंत्री धनजंय मुंडेंकडून वाल्मिक कराडला पाठीशी घातलं जात असल्याचा आरोपही विरोधकांकडून केला जात आहे. कारण, वाल्मिक कराडने शरणागती पत्कारण्यापूर्वी एका व्हिडिओच्या माध्यमातून आपली बाजू मांडली असून स्वत:च्या खासगी कारने तो सीआयडी कार्यालयात हजर झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे, पोलिसांना तो फरार असताना सापडला कसा नाही, असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. आता, सीआयडी पोलिसानी प्रथमच याबाबत माहिती दिली.