एक्स्प्लोर

Rajya Sabha Election 2026: एकनाथ शिंदेंचं धक्कातंत्र, राज्यसभा निवडणुकीसाठी ज्येष्ठांना डावलत 'या' नवख्या चेहऱ्याला संधी, भल्याभल्यांचा अंदाज चुकला

Rajya Sabha Election 2026: राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे.

Rajya Sabha Election 2026: राज्यसभेच्या निवडणुकीच्या (Rajya Sabha Election 2026) पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. नव्या चेहऱ्याला संधी देण्याची चर्चा रंगत असतानाच अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडून ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare) यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. या निर्णयामुळे अनेक ज्येष्ठ नेत्यांचे अंदाज चुकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ज्योती वाघमारे यांनी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय.   

Rajya Sabha Election 2026: चार नावांवर चर्चा

राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या वाट्याला एक जागा आली आहे. तर भाजपने चार उमेदवार दिले आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पार्थ पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर महाविकास आघाडीकडून शरद पवार निवडणूक लढवत आहेत. शिवसेनेकडून ज्योती वाघमारे, राहुल शेवाळे, रोहित टिळक आणि शायना एन.सी. या चार नावांवर चर्चा सुरू होती. यामध्ये ज्योती वाघमारे आणि राहुल शेवाळे यांची नावे आघाडीवर मानली जात होती. मात्र अखेर पक्षाने ज्येष्ठांना डावलत ज्योती वाघमारे यांच्यावर विश्वास दाखवला आहे. हा निर्णय शिंदे यांच्या ‘धक्कातंत्रा’चा भाग मानला जात असून पक्षात नव्या नेतृत्वाला वाव देण्याचा संदेश दिला गेल्याचे बोलले जात आहे.

Jyoti Waghmare: कोण आहेत प्रा. डॉ. ज्योती वाघमारे?

सोलापूरातील आंबेडकरी चळवळीतील आक्रमक चेहरा म्हणून ज्योती वाघमारे यांची ओळख आहे. मोची समजातून येणाऱ्या ज्योती वाघमारे यांची कौटुंबिक पार्श्वभूमी अत्यंत गरीब कुटुंबाची आहे. शैलीदार निवेदिका, फर्ड्या वक्त्या म्हणून ज्योती वाघमारे या सोलापूरकरांना परिचित आहेत. मातृभाषा तेलगू, इंग्रजी भाषेत पीएचडी, मराठीवर प्रभुत्व असल्याने ज्योती वाघमारे एक प्रभावी वक्ता ठरतात.

गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी मानवी हक्क अभियान, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून काम केले आहे. ज्योती वाघमारे यांचे वडील नागनाथ वाघमारे दलित पँथरचे कार्यकर्ते होते. ते एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करायचे, पण चळवळ पाहून लोकांनी त्यांना सोलापूर पालिकेत नगरसेवक म्हणून निवडून दिले होते.

ज्योती वाघमारे यांनीदेखील 2014 साली सोलापूर महिला काँग्रेस शहराध्यक्ष म्हणून काम केले होते. पण नंतर त्या राजकारणापासून अलिप्त झाल्या. यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून त्यांनी राजकारणात पुन्हा प्रवेश केला. त्यांनी शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हणून पक्षाची बाजू आक्रमकपणे मांडली. अनेक जाहीर सभांमधून त्यांनी ठाकरे गटावर तोफ डागण्याचे काम केले. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून त्यांनी स्वत:ची ओळख प्रस्थापित केली होती. जून 2022 रोजी शिवसेनेत मोठी फूट पडली. शिवसेनेत पडलेल्या फुटीत त्यांना संधी मिळाली. डॉ. ज्योती वाघमारे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यावेळी शिंदे गटात महिला नेतृत्वाची मोठी पोकळी होती. त्यांनी प्रवेश करून ती पोकळी भरून काढण्याचे काम केले. त्याचे बक्षीस म्हणून शिंदे गटाकडून त्यांची नियुक्ती शिवसेनेच्या राज्य प्रवक्ता म्हणून करण्यात आली. त्यासोबतच त्यांच्याकडे संपर्कप्रमुख धाराशिव जिल्हा ही अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली होती.

Rajya Sabha Election 2026: भाजपकडून चार उमेदवार रिंगणात

भाजपकडून चार उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. पक्षाच्या विद्यमान संख्याबळानुसार तीन उमेदवार सहज विजयी होऊ शकतात. मात्र चौथी जागा जिंकण्यासाठी त्यांना एकनाथ शिंदे यांच्या गटातील अतिरिक्त मतांची आवश्यकता भासणार आहे. भाजपने विनोद तावडे, रामराव वडकुते, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि माया इवनाते यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

महाराष्ट्रातून निवृत्त होणारे राज्यसभा सदस्य- (Retiring Rajya Sabha members from Maharashtra)

शरद पवार (श.प. गट)
रामदास आठवले (रिपाई) 
फौजिया खान (श.प. गट)
रजनी पाटील (काँग्रेस)
प्रियांका चतुर्वेदी (ठाकरे सेना)
धैर्यशील पाटील (पेण- भाजप)
भागवत कराड (भाजप)

राज्यसभा निवडणुकीचे वेळापत्रक (Rajya Sabha Election 2026)

5 मार्च – उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत
6 मार्च – अर्जांची छाननी
9 मार्च – उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख
16 मार्च – सकाळी 9 ते सायं. 4 मतदान; सायं. 5 नंतर मतमोजणी

आणखी वाचा 

Rajya Sabha Election 2026: राज्यसभेत शरद पवारांना पराभूत करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा मेगा प्लॅन; राज्यसभेसाठी 2 उमेदवार देणार, नेमकं काय घडतंय?

About the author सुरज सावंत

सुरज सावंत हे जवळपास 10 वर्षांपासून माध्यमात कार्यरत आहेत. राजकारण, क्राईम यावर त्यांचा विशेष पकड आहे.
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ED arrests IPAC Vinesh Chandel: ईडीने पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा प्रचार करणाऱ्या 'आयपॅक'च्या प्रमुखालाच उचललं, निवडणुकीच्या तोंडावर झटका
ईडीने पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा प्रचार करणाऱ्या 'आयपॅक'च्या प्रमुखालाच उचललं, निवडणुकीच्या तोंडावर झटका
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी 5 जणांचे अर्ज; अश्विनी देशमुखांच्या विरोधात उमेदवार मैदानात, निवडणूक की बिनविरोध?
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी 5 जणांचे अर्ज; अश्विनी देशमुखांच्या विरोधात उमेदवार मैदानात, निवडणूक की बिनविरोध?
Right To Vote : मतदान करण्याचा आणि निवडणूक लढवण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
मतदान करण्याचा आणि निवडणूक लढवण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
West Bengal : बंगाल निवडणुकीत ट्विस्ट, ओवैसींच्या AIMIM चा हुमायूं कबीर यांच्याशी काडीमोड, 'एकला चलो रे'ची भूमिका
बंगाल निवडणुकीत ट्विस्ट, ओवैसींच्या AIMIM चा हुमायूं कबीर यांच्याशी काडीमोड, 'एकला चलो रे'ची भूमिका
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Asha Bhosle Funeral : सूरसम्राज्ञी आशा भोसलेंना अखेरचा निरोप
Donald Trump Post Ai Image Himself Jesus Christ : आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर पोप लिओ.. Special Report
Iran Us And China : इराण-अमेरिका युद्धामुळे बेहाल पण चीन मालामाल Special Report
Palghar Crime : लव्ह, सेक्स आणि धोका... पालघरमधील धक्कादायक प्रकार
Ashok Kharat : अशोक खरातच्या दारावर ईडी, तपासाची 'साप' शिडी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime news: दादरमध्ये टोळक्याने तरुणाला बेदम मारलं, पत्नी सिद्धिविनायक मंदिरातून धावत आली पण नवऱ्याने जीव सोडला
दादरमध्ये टोळक्याने तरुणाला बेदम मारलं, पत्नी सिद्धिविनायक मंदिरातून धावत आली पण नवऱ्याने जीव सोडला
ED arrests IPAC Vinesh Chandel: ईडीने पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा प्रचार करणाऱ्या 'आयपॅक'च्या प्रमुखालाच उचललं, निवडणुकीच्या तोंडावर झटका
ईडीने पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा प्रचार करणाऱ्या 'आयपॅक'च्या प्रमुखालाच उचललं, निवडणुकीच्या तोंडावर झटका
Ashok Kharat Case: भोंदू अशोक खरात मालमत्तांवर ईडीची मोठी छापेमारी, कोट्यवधींच्या मालमत्तांचे पुरावे सापडले; नाशिक, शिर्डीसह पुण्यात सर्च ऑपरेशन
भोंदू अशोक खरात प्रकरणात ईडीच्या हाती मोठं घबाड, नाशिक, शिर्डीसह पुण्यात सर्च ऑपरेशन, कोट्यवधींच्या मालमत्तांचे पुरावे सापडले
CMRF : मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू, 8 तासात अर्जाला मंजुरी, रुग्णालयांमार्फत अर्जाची सुविधा
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू, 8 तासात अर्जाला मंजुरी मिळणार
Paratwada Crime : तब्बल 180 मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप, अमरावती अश्लील व्हिडीओ प्रकरणात आरोपीवर POCSO गुन्हा दाखल
तब्बल 180 मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप, अमरावती अश्लील व्हिडीओ प्रकरणात आरोपीवर POCSO गुन्हा दाखल
Sanju Samson Close Friend Tovino Thomas: संजू सॅमसनचा जिगरी यार 'हा' सुपरस्टार अभिनेता; 26 कोटींच्या बजेटमध्ये केलीय 176 कोटींची कमाई, रात्री 2-2 वाजेपर्यंत दोघांच्या सुरू असतात गप्पागोष्टी
संजू सॅमसनचा जिगरी यार 'हा' सुपरस्टार अभिनेता; 26 कोटींच्या बजेटमध्ये केलीय 176 कोटींची कमाई, रात्री 2-2 वाजेपर्यंत दोघांच्या सुरू असतात गप्पागोष्टी
Bihar : बिहारमध्ये पहिल्यांदा भाजपचा मुख्यमंत्री होणार, नितीश कुमार राजीनामा देणार, नवी दिल्ली ते पाटणा राजकीय घडामोडी वाढल्या
बिहारमध्ये पहिल्यांदा भाजपचा मुख्यमंत्री होणार, नितीश कुमार राजीनामा देणार, राजकीय घडामोडी वाढल्या
ह्रदयद्रावक... कल्याणमधील अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; तहसील कार्यालातील अधिकारी ठार
ह्रदयद्रावक... कल्याणमधील अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; तहसील कार्यालातील अधिकारी ठार
Embed widget