Agriculture in school : Beed : शालेय अभ्यासक्रमात शेती विषय : विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया
शालेय अभ्यासक्रमात शेती विषयाचा समावेश करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचं वय, बुद्धिमत्तेची सांगड घालून अभ्यासक्रम तयार करण्याच्या सूचनाही शिक्षणमंत्र्यांनी दिल्या आहेत. काल शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि कृषीमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय.
शिक्षण आणि कृषी विभाग संयुक्तपणे अभ्यासक्रम तयार करण्याची कार्यवाही करणार आहे. सध्या राष्ट्रीय शिक्षणात कृषी शिक्षणाचा सहभाग 0.93 टक्के इतका आहे. आता तो तीन टक्क्यांवर जाणे अपेक्षित आहे. शालेय अभ्यासक्रमात शेती विषयाचा समावेश केल्यानं शेतीबद्दल विद्यार्थ्यांमध्ये ओढ निर्माण होईल. त्याशिवाय शेतकऱ्यांविषयीची सामाजिक बांधिलकी निर्माण होतानाच ग्रामीण भागात कृषिसंशोधक तयार होऊन संशोधनाला चालना मिळेल.


















