Zero Hour Full : शिंदेंविरोधात ठाकरेंचा नवा प्लॅन ते कोल्हापूर, नाशिकच्या नागरी समस्या
उद्धव ठाकरेंनी याच भाषेत... याच शब्दांमध्ये... याच आक्रमकतेनं... गेल्या अडीच वर्षांनंतर आपल्या प्रत्येक भाषणात... एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या प्रत्येक आमदारांवर टीका केलीय.. दुसरीकडे एकनाथ शिंदेंनीही पलटवार केलेत.. आता शिवसेनेतील बंडखोरीला तीन वर्ष होतायत.. पण, दोन्ही बाजूनं होणारी टीका काही थांबलेली नाही...
त्याचाच पुढचा अंक आता महाराष्ट्रात सुरु झालाय.. आणि तोच आपण आजच्या झीरो अवरमध्ये पाहणार आहोत.. नमस्कार मी विजय साळवी.. झीरो अवरमध्ये आपलं स्वागत...
मंडळी, एकनाथ शिंदे महायुतीसोबत पुन्हा सत्तेत विराजमान झालेयत.. आणि त्यानंतर त्यांनी ठाकरेंची शिवसेना खालसा करण्याचा चंग बांधलाय.. त्यासाठी त्यांनी ठाकरेंच्या सेनेतील प्रत्येक नाराज नेता, पदाधिकारी, आजी-माजी आमदार आणि आजी-माजी खासदारांमधल्या प्रत्येकासाठी गळ टाकायला सुरुवात केलीय.. आणि त्याचा परिणाम म्हणजे राज्यात महायुतीचं नवं सरकार आल्यापासून गेल्या तीन महिन्यात ठाकरेंच्या पक्षातून बाहेर पडणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे...आणि त्यातही सर्वाधिक नाराज ठाकरे सैेनिकांनी शिंदेंचीच साथ देणं पसंत केलंय, ही बाब विचार करण्यासारखी आहे.. शिंदेंच्या शिवसेनेनं आपल्या इनकमिंगचा पुढचा टप्पाही एव्हाना सुरु केलाय.. आणि त्याला नाव देण्यात आलंय...ऑपरेशन टायगर....
शिंदेंच्या शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची सुरुवात झालीय कोकणातून... शिवसेना ठाकरेंची असो किंवा शिंदेंची... त्यांचा जीव हा कोकणात अडकलाय. याचं कारण दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचं मुंबई-ठाण्यापलीकडे कोकणात प्रस्थ होतं. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिंदेंची शिवसेना आणि भाजपनं कोकणात जोरदार मुसुंडी मारली. गुहागरच्या भास्कर जाधवांचा अपवाद वगळता ठाकरेंचा एकही आमदार कोकणात निवडून आला नाही.
त्यानंतर राजापूरचे माजी आमदार राजन साळवींना आपल्या पक्षात घेऊन शिंदेंनी कोकणातून ठाकरेंची सेना हद्दपार करण्याची घोषणा केली.. त्यावर उद्धव ठाकरेंनी तातडीनं कोकणातील नेत्यासह पदाधिकाऱ्यांची बैठक लावली... आणि अनेक सूचना दिल्या... इतंकच नाही तर त्यांनी कोकण दौराही जाहीर केला.. पण, ठाकरे इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी पक्षातील नेत्यांची बैठक घेऊन, त्यांना प्रत्येक आठवड्यासाठी एक मोठा कार्यक्रमही दिलाय.. हे सगळं आपण आजच्या भागात पाहणार आहोत.. पण सुरुवात झीरो अवरसाठीच्या प्रश्नानं.. आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला.
All Shows


































