Zero Hour Full Episode : महापालिका निवडणुकीत बंडखोरीचा फटाक कोणाला बसेल?
जगभरात नव्या वर्षांचं स्वागत मोठ्या जल्लोषात झालं. त्याचं सेलिब्रेशन अजूनही सुरुय. पण आपल्या महाराष्ट्रात या सेलिब्रेशनला महापालिका निवडणुकांमधल्या वादांचा रंग आहे. हे सारं एकीकडे होतं असलं तरी राज्यातील बड्या नेत्यांना नव्या वर्षाचं स्वागत करताना एका मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागतोय. त्यामुळं त्यांचं न्यू ईयर प्लॅनिंगच गडबडलंय असं आपण नक्की म्हणू शकतो... आता तुम्ही म्हणाल की नेमकं असं काय घडलंय.. की बड्या नेत्यांच्या न्यू ईयर सेलिब्रेशनला गालबोट लागलं.
तर ऐका मंडळी, ही गोष्ट आहे बंडोबांची. बरोबर ऐकलंत.. बंडोबांची.. राज्यात एकाच वेळी २९ महापालिकांसाठी निवडणुका लागल्यायत आणि त्यामुळं नगरसेवक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांची जवळपास आठ वर्षांची प्रतीक्षा संपली. त्यात राज्यात दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी, भाजप आणि काँग्रेससारखे मिळून सात प्रमुख पक्ष आहेत. शिवाय मनसे, वंचित, एमआयएम, रिपाईं, शेकापसारखे इतरही महत्वाचे पक्ष या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळं आता युती-आघाड्यांसारखे अपवाद वगळता एका जागेसाठी किमान दहा राजकीय पक्षांचे पर्याय उमेदवारांकडे आहेत.
काय असतं ना मंडळी, निवडणुकांमध्ये सर्वात महत्वाचे कोणते मुद्दे ठरतात.. तर पहिला मुद्दा - जिंकून येण्याची क्षमता आणि शाश्वती. म्हणजेच पक्ष उमेदवारांमध्ये जिंकून येण्याची क्षमता पाहतो, तर उमेदवार त्या पक्षामध्ये विजयाची शाश्वती पाहतात. सध्या दिल्ली ते गल्ली भाजपची सत्ता असल्यानं भाजपकडे उमेदवारीसाठी गर्दी होण्याची सर्वाधिक शक्यता होती. आणि झालंही अगदी तसंच. पण इच्छुक उमेदवारांची ही गर्दी साऱ्याच पक्षांची डोकेदुखी ठरतेय. बरं नाराज बंडोबांनी फक्त भाजपलाच नाही तर शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेलाही चिंतेत टाकलंय.
All Shows

































