(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ravindra Jadeja : टीम इंडियासाठी खुशखबर! रवींद्र जाडेजा दुखापतीतून सावरतोय, पाहा सराव सुरु केल्याचा VIDEO
Ravindra Jadeja: रवींद्र जाडेजाने गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर आता एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो पुन्हा सराव करताना दिसत आहे.
Ravindra Jadeja Injury Update : भारतीय संघ टी20 विश्वचषक खेळण्यासाठी (T20 World Cup 2022) सज्ज झाला असून सराव सामन्यातही भारताने चांगली कामगिरी केली. पण असं असतानाही संघाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) संघात नसनं भारतीय संघासाठी मोठा धक्का आहे. दुखापतीमुळे विश्वचषकापूर्वीच संघातून बाहेर गेलेला जाडेजा गुडघ्याच्या शस्त्रक्रियेमुळे विश्वचषक खेळत नाहीये. दरम्यान आता तो यातून रिकव्हर होत असून नुकताच सराव करतानाचा त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. .
आशिया कपच्या (Asia Cup 2022) पाकिस्तानविरुद्धच्या (IND vs PAK) सामन्यात रवींद्र जाडेजाने 35 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती, त्यामुळे विश्वचषकासाठी तो भारतासाठी महत्त्वाचा खेळाडू ठरणार असं सर्वांना वाटत होतं. पण तितक्यात त्याचा दुखापतीमुळे संघाबाहेर जावं लागलं, ज्यानंतर जाडेजाची गुडघ्याची शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून आता त्याने पुन्हा प्रशिक्षण सुरू केले आहे. जाडेजाने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये हळूहळू धावताना दिसत आहे.
पाहा VIDEO-
View this post on Instagram
2022 पासून रवींद्र जाडेजाचा फॉर्म
दुखातग्रस्त होण्यापूर्वी रवींद्र जाडेजा जबरदस्त फॉर्ममध्ये होता. त्यानं यावर्षी 9 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं. ज्यात 50.25 च्या सरासरीनं 201 धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 141.54 इतका होता. तर, गोलंदाजीत जाडेजाला काही खास कामगिरी करता आली नाही. या सामन्यात त्याला फक्त 5 विकेट्स घेता आल्या आहेत.
हे देखील वाचा-