(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Team India : पाकिस्तानविरुद्ध पंत संघाबाहेर जाण्याची शक्यता, कार्तिक असणार संघात, कशी असेल टीम इंडियाची रणनीती?
Team India for WC : भारतीय संघ 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध सामना खेळणार आहे. हा वर्ल्डकपचा भारताचा पहिलाच सामना असल्याने नेमकी अंतिम 11 कशी असेल? याबाबत अनेक चर्चा होत आहेत.
Team India in T20 World Cup : टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) अखेर सुरु झाला असून सुपर 12 चे सामना 22 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. भारतीय संघाचा विचार करता भारत पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे. हा वर्ल्डकपचा भारताचा पहिलाच सामना असल्याने नेमकी अंतिम 11 कशी असेल? याबाबत अनेक चर्चा होत आहेत. त्यात दोन दर्जेदार यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक (Dinesh karthik) आणि (Rishabh Pant) संघात असल्याने नेमकी कोणाला संधी मिळेल याबाबतही चर्चा होत आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडिया ऋषभ पंतऐवजी दिनेश कार्तिकचा संघात समावेश करू शकते. पंतचा अलीकडचा फॉर्म खास नसल्यानं हा निर्णय घेतला जाऊ शकतो. पंतने वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यातील 2 सामन्यांत प्रत्येकी 9 धावांच केल्या. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यातही त्याला स्थान मिळालं नाही. या सामन्यात त्याच्या जागी दिनेश कार्तिकला संधी मिळाली आणि कार्तिकने सामन्यात 10 चेंडूत 20 धावांची खेळी केली. भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा अजूनही कार्तिकला संघाचा फिनिशर म्हणून उत्तम पर्याय मानत असल्याने पंत जागी कार्तिकची वर्णी लागू शकते.
कशी असू शकते दोन्ही संघाची अंतिम 11?
टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, युजवेंद्र चहल.
टीम पाकिस्तान
बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, शान मसूद, हैदर अली, इफ्तिखार अहमद, आसिफ अली, शादाब खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हारिस रउफ आणि शाहीन शाह आफ्रिदी.
संघात बुमराहच्या जागी शमीची एन्ट्री
भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्वचषक अगदी तोंडावर असताना दुखापत झाली. त्यामुळे भारतात बुमराहच्या जागी कोण खेळणार? हा प्रश्न सर्वांसमोर होता. ज्यानंतर नुकतीच टीम इंडियाने अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची बुमराहच्या जागी संघात एन्ट्री केली आहे. त्यामुळे आता बुमराहच्या जागी शमी आल्यानंतर T20 विश्वचषकासाठी भारताचे अंतिम 15 खेळाडूंची यादी समोर आली आहे.
असा आहे भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह
राखीव खेळाडू : मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, शार्दूल ठाकूर
हे देखील वाचा-