एक्स्प्लोर

भारताचा 7 धावांनी विजय, शोएब अख्तरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं? टीम इंडियाच्या दोन खेळाडूंचं नाव घेत म्हणाला...

IND vs ENG : भारतानं उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडचा 7 धावांनी पराभव केला.भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अंतिम सामना 8 मार्चला सामना अहमदाबाद येथे होणार आहे.

मुंबई : भारतानं इंग्लंडला 7 धावांनी पराभूत करत टी 20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. संजू सॅमसनची दमदार फलंदाजी, जसप्रीत बुमराहची गोलंदाजी आणि अक्षर पटेलच्या अफलातून क्षेत्ररक्षणामुळं भारतानं अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. इंग्लंडच्या बेथेलनं 105 धावांची खेळी करत एकाकी झुंज दिली. भारताच्या विजयावर मोहम्मद कैफ आणि शोएब अख्तरनं प्रतिक्रिया दिली आहे.भारतानं प्रथम फलंदाजी करताना 253 धावा केल्या होत्या. इंग्लंडनं या धावसंख्येचा पाठलाग करताना 7 विकेटवर 246 धावा केल्या. 

मोहम्मद कैफ काय म्हणाला? 

आजचा सामना दमदार झाला, मी असे सामने कमी पाहिले आहेत. आजच्या मॅचमध्ये 500 धावा झाल्या. सर्वांनी चौकार षटकार मारले. शेवटच्या ओव्हरमध्ये कोण जिंकणार हे समजलं. टीम इंडिया प्रथम फलंदाजी करतेय हा चांगला निर्णय होता. भारत 7 धावांनी जिंकला आहे. जसप्रीत बुमराहनं 4 ओव्हरमध्ये 33 धावा दिल्या एक विकेट घेतली. यामुळं भारतानं विजय मिळवला, असं कैफ म्हणाला. 

संजू सॅमसनजी कामगिरी केली तिथून 200 धावा बनतात. तिलक वर्मा, इशान किशन, हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांनी केलेल्या कामगिरीमुळं भारत 253 धावांपर्यंत मजल मारली. भारतानं सामना जिंकला हे पूर्ण संघाचं श्रेय आहे, असंही कैफ म्हणाला.रोहित शर्माकडे सहा गोलंदाज होते, यावेळी सूर्यकुमार यादवकडे 5 गोलंदाज आहेत. कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादवचे निर्णय देखील महत्त्वाचे ठरले, असंही मोहम्मद कैफनं म्हटलं.  

शोएब अख्तर काय म्हणाला?

अक्षर पटेल चांगला क्षेत्ररक्षक असून त्यानं गोलंदाजी केली आहे. भारत फलंदाजीला येतो तेव्हा जगातील सर्वात बेस्ट टीम आहे. भारतानं क्षेत्ररक्षणात कमी चुका केल्या. इंग्लंडनं जास्त चुका क्षेत्ररक्षणात केल्या ते घाबरले होते. जर सॅम करननं 15 बॉल खेळले नसते तर मॅच फसली असती. बुमराह जेव्हा धावा वाचवण्यासाठी येतो तेव्हा ते अफलातून कामगिरी करतात. बुमराहनं यॉर्करचा मारा केला आणि धावा वाचवल्या, असं शोएब अख्तरनं म्हटलं. 

भारताच्या संघ व्यवस्थापनाला संजू सॅमसनला संधी देण्यासंदर्भात क्रेडिट द्यावं लागेल. संघ व्यवस्थापनानं दोन जणांना बाहेर बसवलं आहे. संजू सॅमसन 10 वर्ष भारतासाठी खेळला असता तर त्याच्या नावावर प्रत्येक फॉरमॅटमध्ये 10 -10 हजार धावा लागल्या असत्या. संजू सॅमसन हा रोहित शर्माची बेटर कॉपी वाटतो. संजू मॅच फिनिशर आहे. संजू सॅमसनं फलंदाजीला येताच जोफ्रा आर्चरची धुलाई केली. संजू सॅमसननं त्याच्या फलंदाजीनं भारताच्या डावाचा पाया रचला, असं शोएब अख्तरनं म्हटलं आहे. 

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना उपांत्य फेरीत झाला असता आनंद झाला असता, असं शोएब अख्तर म्हणाला. भारत जिंकलाय याचा आनंद होतोय, असं शोएब अख्तर म्हणाला.  जर, भारत आणि पाकिस्तान सामना झाला असता तर पाकिस्तान जिंकला असता, असंही शोएब अख्तरनं म्हटलं. भारतानं अहमदाबादमध्ये जाऊन न्यूझीलंडचा पराभव करावा, असंही शोएब अख्तरनं म्हटलं.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: भाजप नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल; एबीपी माझाच्या बातमीनंतर पोलिसांची कारवाई
Maharashtra Live blog updates: भाजप नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल; एबीपी माझाच्या बातमीनंतर पोलिसांची कारवाई
Arvind Kejriwal : दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
SIP : एसआयपीचा हप्ता बाऊन्स झाल्यास काय होतं ? बँकांचा नियम जाणून घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका
SIP Tips: एसआयपीचा हप्ता बाऊन्स झाल्यास काय होतं ? बँकांचा नियम जाणून घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका
IPS Transfer : राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: भाजप नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल; एबीपी माझाच्या बातमीनंतर पोलिसांची कारवाई
Maharashtra Live blog updates: भाजप नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल; एबीपी माझाच्या बातमीनंतर पोलिसांची कारवाई
Arvind Kejriwal : दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
SIP : एसआयपीचा हप्ता बाऊन्स झाल्यास काय होतं ? बँकांचा नियम जाणून घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका
SIP Tips: एसआयपीचा हप्ता बाऊन्स झाल्यास काय होतं ? बँकांचा नियम जाणून घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका
IPS Transfer : राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
Mahesh Shinde : एकनाथ शिंदेंच्या सभेत आमदार महेश शिंदेंना मोठा धक्का, कोरेगावचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे भाजपमधून शिवसेनेत दाखल
कोरेगावच्या माजी नगराध्यक्षांनी आमदार महेश शिंदेंची साथ सोडली, राजाभाऊ बर्गेंच्या हाती कमळाऐवजी धनुष्यबाण
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
Godfather Fame Actor Al Pacino Life Story: 85 वर्षांचा सुपरस्टार, 32 वर्षांची गर्लफ्रेंड अन् दोन वर्षांचा मुलगा; सिनेसृष्टीच्या 'गॉडफादर'चे अफेअर्सही सतराशे साठ, ओळखलं का कोण?
85 वर्षांचा सुपरस्टार, 32 वर्षांची गर्लफ्रेंड अन् दोन वर्षांचा मुलगा; सिनेसृष्टीच्या 'गॉडफादर'चे अफेअर्सही सतराशे साठ, ओळखलं का कोण?
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
Embed widget