T20 world Cup 2022: सूर्यासमोर 20वं षटक टाकताना गोलंदाज जोडतात हात; अवघ्या 18 चेंडूत ठोकल्यात 'इतक्या' धावा
Surya Kumar in 20th over in T20Is: ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी-20 विश्वचषकात (T20 world Cup 2022) भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवचा रौद्रवतार पाहायला मिळत आहे.
Surya Kumar in 20th over in T20Is: ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी-20 विश्वचषकात (T20 world Cup 2022) भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार पाहायला मिळत आहे. या स्पर्धेतील पाच सामन्यात त्याच्या बॅटीमधून तीन अर्धशतक झळकली आहेत. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादतही तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं 193 च्या पेक्षा जास्त स्ट्राईक रेटनं फलंदाजी करत 225 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे, 20व्या षटकात सूर्यकुमार यादव गोलंदाजासाठी घातक ठरतोय. टी-20 विश्वचषकाच्या पाच पैकी तीन सामन्यात सूर्यानं 20वं षटक खेळलं, ज्यात त्यानं एकूण 18 चेंडूचा सामना करत 72 धावा ठोकल्या.
20 व्या षटकात सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार
सूर्यकुमार यादव 20व्या षटकात गोलंदाजांसाठी घातक ठरत असल्याचं आतापर्यंतचे आकडे सांगत आहेत. क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटच्या शेवटच्या षटकात त्यानं गोलंदाजाचा खरपूस समाचार घेतलाय. टी-20 विश्वचषक 2022 सूर्यानं आतापर्यंत 18 चेंडूत 400 स्ट्राईक रेटनं 72 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याच्या बॅटीतून 10 षटकार आणि एक चौकार निघालाय.
सूर्याची टी-20 विश्वचषकातील कामगिरी:
पहिला सामना | भारत विरुद्ध पाकिस्तान | 10 चेंडूत 15 धावा |
दुसरा सामना | भारत विरुद्ध नेदरलँड्स | 25 चेंडूत 51 धावा |
तिसरा सामना | भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका | 40 चेंडूत 68 धावा |
चौथा सामना | भारत विरुद्ध बांगलादेश | 16 चेंडूत 30 धावा |
पाचवा सामना | भारत विरुद्ध झिम्बाब्वे | 25 चेंडूत 61 धावा |
20व्या षटकात सर्वाधिक षटकार लगावणारे फलंदाज
टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताकडून 20व्या षटकात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम हार्दिक पांड्या आणि एमएस धोनी यांच्या नावावर आहे. पांड्यानं 123 चेंडूत 12 तर, धोनीनं 251 चेंडूत 12 षटकार लगावले आहेत. त्याचबरोबर सूर्यकुमारनं 20व्या षटकात खेळलेल्या 18 चेंडूत 10 षटकार मारले आहेत.
हे देखील वाचा-