T20 World Cup 2022, Semifinals : भारत, पाकिस्तानसह इंग्लंड अन् न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये, कधी होणार सामने, पाहा सविस्तर वेळापत्रक
Team India : टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीतील अखेरच्या सामन्यात भारतानं झिम्बाब्वेवर विजय मिळवल्यानंतर साखळी सामने संपले असून आता सेमीफायनलचे सामने रंगणार आहेत.
T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियाच्या भूमीत सुरु टी20 विश्वचषक स्पर्धा (T20 World Cup 2022) आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. सुपर 12 चे साखळी सामने संपले असून आता सेमीफायनल सामन्यांना सुरुवात होणार आहे. भारत, पाकिस्तानसह इंग्लंड आणि न्यूझीलंड हे चार संघ सेमीफायनलमध्ये पोहोचले असून एकमेंकाविरुद्ध सामन्यानंतर यातील दोनजण फायनलचा सामना खेळणार आहेत. साखळी सामन्यांचा विचार करता दोन्ही ग्रुपमधून सर्वाधिक म्हणजेच 8 गुणांसह भारताचा संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे.
तर सामन्यांचा विचार केला तर सर्वात पहिली सेमीफायनल पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये 9 नोव्हेबर रोजी सिडनीच्या क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. तर त्यानंतर लगेचच 10 नोव्हेंबर रोजी भारत आणि इंग्लंड हा सामना अॅडलेडच्या अॅडलेड ओव्हल मैदानावर रंगणार आहे. दोन्ही सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता खेळवले जाणार असून त्यापूर्वी अर्धातास नाणेफेक होईल.
सेमीफायनलचं वेळापत्रक
सामना | संघ | दिवस | वेळ | ठिकाण |
पहिली सेमीफायनलची मॅच | पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड | 9 नोव्हेंबर | दुपारी 1.30 | सिडनी क्रिकेट स्टेडियम |
दुसरी सेमीफायनलची मॅच | भारत विरुद्ध इंग्लंड | 10 नोव्हेंबर | दुपारी 1.30 | अॅडलेड ओव्हल क्रिकेट स्टेडियम |
कुठे पाहता येणार सामना?
या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.
फायनलमध्ये भारत-पाकिस्तान येऊ शकतात आमने-सामने
तर ग्रुप 2 मधून भारत आणि पााकिस्तान हे दोन्ही संघ सेमीफायनलमध्ये गेले आहेत. भारतानं 5 पैकी 4 सामने जिंकून एकूण 8 गुणांसह दिमाखात सेमीफायनलमध्ये एन्ट्री मिळवली आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिका अखेरच्या सामन्यात नेदरलँडकडून पराभूत झाल्याने पाकिस्तान बांग्लादेशला मात देत सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. आता भारत इंग्लंडसोबत आणि पाकिस्तान न्यूझीलंडसोबत सेमीफायनल खेळेल आणि दोघे संघ आपआपले सामने जिंकून फायनलमध्ये आमने-सामने येऊ शकतात.
हे देखील वाचा-
Hardik Catch Video : एकहाती सामना फिरवण्याची ताकद असणाऱ्या हार्दिकनं एकहाती पकडलेला कॅच पाहिलात का?