IND vs ENG: ॲडिलेडच्या मैदानापासून सूर्याच्या फॉर्मपर्यंत, रोहित शर्माच्या पत्रकार परिषदेमधील महत्वाचे मुद्दे
Rohit Sharma’s Press Conference: टी-20 विश्वचषक 2022 मधील (T20 World Cup 2022) दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) एकमेकांशी भिडतील.

Rohit Sharma’s Press Conference: टी-20 विश्वचषक 2022 मधील (T20 World Cup 2022) दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) एकमेकांशी भिडतील. भारत आणि इंग्लंड यांच्यातील हा सामना 10 नोव्हेंबर 2022 रोजी ॲडिलेडच्या (Adelaide) ॲडिलेड ओव्हल मैदानावर खेळला जाणार आहे. या मोठ्या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानं (Rohit Sharma) पत्रकार परिषदेत अनेक महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. रोहितनं ॲडिलेड मैदानापासून तर सूर्यकुमार यादवचा (Suryakumar Yadav) फॉर्म अशा अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं.
ॲडिलेडचं मदानाबाबत रोहित शर्मा काय म्हणाला?
ऑस्ट्रेलियातील काही मैदानांच्या आकारमानात मोठा फरक आहे. मेलबर्न हे मोठं मैदान आहे. मेलबर्नच्या मैदनाच्या तुलनेत ॲडिलेड छोट मैदान आहे. आकार भिन्न असल्यानं थोडं अवघड आहे, म्हणून आम्ही फील्डनुसार तयारी करत आहोत, असंही रोहित शर्मानं म्हटलंय.
इंग्लंडविरुद्ध भारताची तयारी कशी?
रोहित पुढं म्हणाला की, "भारतानं जुलै महिन्यात इंग्लंडला त्याच्याच मायभूमीत टी-20 मालिकेत पराभूत केलं होतं. या मालिका जिंकल्यानं भारतीय संघातील खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला आहे. जगभरातील घातक संघामध्ये इंग्लंडच्या संघाचाही समावेश केला जातो. यामुळं आम्ही त्यांना यापूर्वी हरवलं आहे, असा विचार करून खेळता येणार नाही."
सूर्याच्या फॉर्मवर रोहितची मोठी प्रतिक्रिया
यंदाच्या टी-20 विश्वचषकात भारताचा स्टार फंलंदाज सूर्यकुमार यादव सातत्यानं चांगली कामगिरी करताना दिसत आहे. दरम्यान, सूर्याच्या फॉर्मबाबत रोहित शर्माला प्रश्न विचारला असता तो म्हणाला की, "सूर्यकुमार हा प्रत्येक सामन्यात नव्यानं सुरुवात करणारा खेळाडू आहे. तो कोणताही दबाव घेत नाही आणि कोणत्याही परिस्थितीसाठी तयार असतो. अशा मैदानात मोकळी जागा कमी असल्याने त्यांना छोट्या मैदानांवर खेळणं आवडत नाही."
दिनेश कार्तिक की ऋषभ पंत, कोणाला संधी?
इंग्लंडविरुद्ध सामन्यात अनुभवी दिनेश कार्तिकला संधी मिळणार की, ऋषभ पंत भारतीय संघाच्या प्लेईंग इलेव्हनचा भाग असेल? असा प्रश्न अनेकांना पडलाड. यावर रोहित शर्मा म्हणाला की, आमचे सर्व खेळाडू प्लेईंग इलेव्हन भाग बनण्यासाठी सज्ज आहेत. त्यांना प्रत्येक सामन्यासाठी सतर्क राहण्यास सांगितलं जात आहे. इंग्लंडविरुद्ध सामन्यात कोणाला संधी मिळणार, याबाबत उद्याच निर्णय होईल. यासंदर्भात आता काहीच बोलू शकत नाही.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
