एक्स्प्लोर

IND vs NED : पठ्ठ्यानं भारत-नेदरलँड सामना सुरु असतानाच केला गर्लफ्रेंडला प्रपोज, तिनेही दिला होकार, पाहा VIDEO

ICC : भारत आणि नेदरलँड यांच्यातील टी20 विश्वचषक सामना सिडनी मैदानावर पार पडला असून यावेळी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका टीम इंडिया फॅनने त्याच्या गर्लफ्रेंडला प्रपोज केल्याचा व्हिडीओ स्वत: आयसीसीने पोस्ट केला आहे.

IND vs NED, Viral Video : टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धा ऑस्ट्रेलियात सुरु आहे. भारताने स्पर्धेची सुरुवात दमदार पद्धतीने केली असून पाकिस्ताननंतर आता नेदरलँडवरही (IND vs NED) विजय मिळवला आहे. भारत विरुद्ध नेदरलँड सामना सिडनी येथे नुकताच पार पडला. या सामन्यात भारतानं नेदरलँडवर 56 धावांनी विजय मिळवत मैदान मारलंच पण सोबतच एका भारतीय चाहत्याने प्रेमाचं मैदानही मारलं आहे. एका टीम इंडियाच्या फॅनने आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. आयसीसीने (ICC) स्वत: त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरही हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

विशेष म्हणजे तरुणाने तरुणीला प्रपोज केल्यावर तिने होकारही दिला. त्यामुळे आयसीसीने व्हिडीओ टाकताना त्याला 'ती हो म्हणाली' असं कॅप्शनही दिलं आहे. तसंच या व्हिडीओवर निर्णय बाकी आहे, असं मजेशीर टेक्स दिलं असून एखाद्या थर्ड अंपायर डिसीजनची वाट जशी क्रिकेटप्रेमी स्क्रिनवर पाहतात तशाच भावना हा व्हिडीओ पाहून येत आहेत. तर हा व्हिडीओ तुम्हीही पाहू शकता...

पाहा VIDEO

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ICC (@icc)

 

प्रेमाच्या मैदानात फॅनचा तर क्रिकेटच्या मैदानात भारताचा विजय

भारत विरुद्ध नेदरलँड सामन्यात टीम इंडियानं जबरदस्त प्रदर्शन दाखवलं. एका मोठ्या धावसंख्येच्या फरकाने भारताने सामना जिंकला आहे. सामन्यात भारतानं आधी फलंदाजी करत 179 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. यामध्ये रोहित, विराटसह सूर्यकुमारनं अर्धशतक झळकावलं. ज्यानंतर नेदरलँड संघाला 123 धावांत रोखलं, ज्यामुळे 56 धावांनी सामना भारताने जिंकला आहे. फलंदाजाच्या दमदार फलंदाजीनंतर   गोलंदाजांनी उत्तम गोलंदाजी करत नेदरलँडची धावसंख्या अधिक होऊ दिली नाही. या विजयासह भारत ग्रुप 2 च्या गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहोचला आहे.

हे देखील वाचा-

IND vs NED, 1st Inning Highlights : विराट-रोहितसह सूर्यानंही ठोकलं दमदार अर्धशतक, भारताकडून नेदरलँडला 180 धावांचं लक्ष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget