Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Vidhansabha 2024 :
Vidhansabha 2024 : वर्धा : आगामी विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची चाचपणी आणि काही नेत्यांकडून घोषणाही करण्यात येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून यापूर्वी काही नावांची जाहीरपणे घोषणा करण्यात आलीय. तर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मराठवाडा दौऱ्यात मनसेचे 7 उमेदवार जाहीर केले आहेत. विशेष म्हणजे आज त्यांनी विदर्भ दौरा आटोपता घेतला असून नागपूरमधील त्यांच्या उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यातच, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि आमदार बच्चू कडू यांच्या परिवर्तन आघाडीचा पहिला उमेदवार जाहीर झाला आहे. आमदार बच्चू कडू (Bachhu kadu) यांनी वर्धा जिल्ह्यातील आर्वी विधानसभेसाठी (Vidhansabha) जयकुमार बेलखडे यांची उमेदवारी जाहीर केली. तसेच, तिसऱ्या आघाडीच आमदारच पुढचा मुख्यमंत्री ठरवतील, असेही त्यांनी म्हटले.
आमचे दहा जरी आमदार निवडून आले तर आम्ही गणपती बसविल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत महाराष्ट्रात भावी मुख्यमंत्री तिसऱ्या आघाडीशिवाय ठरणार नसल्याचे संकेत आमदार बच्चू कडूंनीही यांनी दिले आहे. याचवेळी उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर सडकून टीका देखील केली. वर्ध्याच्या कारंजा घाडगे येथे प्रहार पक्षाच्या सभेत राज्यातील प्रहारचा पहिला उमेदवार बच्चू कडू यांनी स्टेजवरून घोषित केला आहे. तेलंगणातील राजकीय पक्ष असलेल्या बीआरएस (BRS) मधून प्रहारमध्ये प्रवेश केलेल्या जयकुमार बेळखडे यांच्या नावाची आर्वी विधानसभेवर (Arvi Legislative Assembly Elections 2024) प्रहारचा उमेदवार म्हणून नाव घोषित करण्यात आले आहे.
कोण आहेत जयकुमार बेलखडे
वर्धा जिल्ह्यातील आर्वी विधानसभेसाठी आमदार बच्चू कडू यांनी प्रहार संघटनेकडून पहिला उमेदवार जाहीर केला. वर्धा जिल्ह्यातील स्वराज्य शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयकुमार बेलखडे यांनी काही दिवसांपूर्वीच आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसह प्रहार पक्षात प्रवेश भेट घेतला होता. जयकुमार बेलखडे हे प्रहार पक्षाकडून आर्वी विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे त्यावेळीच चर्चेत होते. जयकुमार बेलखडे यांनी स्वराज्य शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आर्वी विधानसभेत आपलं संघटन निर्माण केलं आहे. शेतकऱ्यांसाठी काम करणारा तरुण कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. गत महिन्यापूर्वी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील भेट घेतली होती. त्यावेळी ते मनसेत प्रवेश करणार असल्याचे बोललं जात. मात्र, बच्चू कडू यांच्या कुरळपूर्णा येथील निवासस्थानी प्रहार पक्षात त्यांनी प्रवेश केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. त्यानंतर, आज बच्चू कडू यांनी त्यांनी उमेदवारी जाहीर केली. दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षातही त्यांनी प्रवेश केला होता. मात्र, विधानसभा निवडणुकांत बीआरएस पक्षाचा पराभव झाल्याने महाराष्ट्रातील त्यांचे नेते आता राज्यातील राजकीय पक्षात जागा शोधत आहेत.
हेही वाचा
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार