Mahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतं
जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची बैठक -------------- मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह उदय सामंत, प्रफुल पटेल, तटकरे उपस्थित ---------------- विधानसभा निवडणुकीत महायुतीचे मतदारसंघांचे जागावाटप आणि कोण उमेदवार असावेत या संदर्भात महत्वाची चर्चा सुरू.
गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना वृत्तपत्रांत तीन वेळा जाहिरात द्यावी लागेल, गुन्हेगार उमेदवार का निवडला हे पक्षांना सांगावं लागेल...केंद्रीय निवडणूक आयोगचं कडक धोरण...
बातमी निवडणूक आयोगानं केलेल्या मोठ्या घोषणेची...
विधानसभा निवडणुकीत उमेदवारांना गुन्हेगारी पार्श्वभूमीची ३ वेळा जाहिरात द्यावी लागणार आहे... गुन्हेगारी पार्श्वभूमीचा उमेदवार निवडण्याचं कारण पक्षांना जाहिरात देऊन सांगावं लागणार आहे...
निवडणुकीत होणाऱ्या गैरप्रकाराची तक्रार सी-व्हिजील अॅपद्वारे करता येणार आहे.. तक्रार केल्यानंतर ९० मिनिटात आयोगाची टीम घटनास्थळी पोहोचणार आहे.. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत ही माहिती दिलीय..