एक्स्प्लोर

Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'

पाचव्या सिझनच्या वाईल्ड कार्ड एन्ट्रीसाठी आता अभिजीत बिचुकलेंच्या नावाची जोरदार चर्चा सुरु झाली. त्यातच त्यांनी नुकतीच रेडीओ सिटीला दिलेल्या मुलाखतीमध्ये यावर भाष्यही केलं आहे

मुंबई : अभिनेता रितेश देशमुखच्या सुत्रसंचालनामुळे यंदा चांगलाच चर्चेत असलेला बिग बॉस मराठीचा शो तुफान राडा आणि गोंधळ घालणारा ठरत आहे. सोशल मीडिया इन्फ्लुरन्सने यंदाचा बिग बॉस शो गाजवला आणि तुफान वाजवलाही. त्यातच, आता यंदाचा सिझन अंतिम टप्प्यात असताना बिग बॉसच्या घरात आता अभिजीत बिचुकलेंची (Abhijeet bichukale) एंट्री झाल्याचं दिसून येत आहे. कर्लर्स मराठीने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन व्हिडिओ देखील शेअर केला आहे. तर, मै हूँ डॉन गाण्यावर एंट्री करताच बिचुकले घरातही डॉनप्रमाणे वागताना दिसून येतात.  बिग बॉस मराठीचं (Big boss) घर हे आतापर्यंत अनेक सदस्यांनी गाजवलं. पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा सिझन प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरला. आता पाचव्या सिझनमध्येही घरातले राडे, भांडणं या सगळ्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षक व्यक्त होत असतात. त्यातच आता पाचव्या सिझनच्या वाईल्ड कार्ड एन्ट्रीची सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. 

बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनच्या वाईल्ड कार्ड एन्ट्रीसाठी आता अभिजीत बिचुकलेंच्या नावाची जोरदार चर्चा सुरु झाली. त्यातच त्यांनी नुकतेच रेडीओ सिटीला दिलेल्या मुलाखतीमध्ये यावर भाष्यही केलं होतं. तसेच,  माझ्याशिवाय बिग बॉस मराठी चालणारच नाही, असा विश्वासही बिचुकले यांनी व्यक्त केला होता. त्यानुसार, आता खरंच अभिजीत बिचुकलेंची बिग बॉसच्या घरात एंट्री झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज रात्री होणाऱ्या शोमध्ये अभिजीत बिचकुलेंची दमदार एंट्री होत आहे. त्यामुळे, पुन्हा एकदा फूट टू राडा पाहायला मिळणार आहे.   

मै हूँ डॉन गाण्यावर अभिजीत बिचुकलेंची एंट्री होताच, त्याने अंकिताला खडसावलं. तसेच, नेहमीच्या स्टाईलने पुन्हा एकदा राडा करणार असल्याचे संकेतही दिले आहेत. अंकिताने सूरजला नॉमीनेट केल्याबद्दल 'बहीण असं कधीच करत नाही, तुमचा कुचकेपणा दिसला' अशा शब्दात अकिंतावर आगपाखड केलीय. तसेच, 'मला इतका राग येतोय की, मी या घरातलं काहीही फोडू शकतो' असंही बिचुकले म्हणताना दिसून येतात. त्यामुळे, अभिजीत बिचुकलेंच्या एंट्रीने आता काय राडा होणार हेही बिग बॉसच्या घरात पाहावे लागेल. दरम्यान, अभिजीत बिचुकलेंसह यापूर्वी शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओत राखी सावंतचीही एंट्री झाली आहे. त्यामुळे, बिग बॉस मराठीच्या अंतिम काही दिवसांत घरात नुसता गोंधळच गोंधळ दिसून येईल.

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

स्टार प्रवाहच्या 'आनंदी'ची चर्चा, 2 दिग्गज कलाकार एकाच मालिकेत दिसणार; प्रेक्षकांचा आनंद शिगेला
स्टार प्रवाहच्या 'आनंदी'ची चर्चा, 2 दिग्गज कलाकार एकाच मालिकेत दिसणार; प्रेक्षकांचा आनंद शिगेला
सावित्रीबाईंच्या शिक्षणाची पहिली पायरी, जोतीरावांची भूमिका साकारणार 'आई कुठे काय करते' फेम प्रसिद्ध अभिनेता
सावित्रीबाईंच्या शिक्षणाची पहिली पायरी, जोतीरावांची भूमिका साकारणार 'आई कुठे काय करते' फेम प्रसिद्ध अभिनेता
'बायको पाहिजे...' उन्हातान्हात, मुंबईच्या रस्त्यांवर, लोकलमध्ये फिरणारा पोस्टर तरुण कोण? VIDEO व्हायरल
'बायको पाहिजे...' उन्हातान्हात, मुंबईच्या रस्त्यांवर, लोकलमध्ये फिरणारा पोस्टर तरुण कोण? VIDEO व्हायरल
Bigg Boss Marathi Session 6: कॅप्टन्सी टास्कमध्ये दोऱ्यांमध्ये अडकला संकेत; 'त्याच्या गळ्यात दोरी अडकलीय!', राखी ओरडली, बिग बॉसनं थांबवला टास्क
कॅप्टन्सी टास्कमध्ये दोऱ्यांमध्ये अडकला संकेत; 'त्याच्या गळ्यात दोरी अडकलीय!', राखी ओरडली, बिग बॉसनं थांबवला टास्क

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ट्रम्पशाहीला दणका देण्याची तयारी! अमेरिका आणि इराण युद्धामुळे अर्थव्यवस्थेवर प्रचंड दबाव; होरपळलेल्या आखाती देशांकडून अमेरिकेच्या गुंतवणूक करारांचा फेरविचार करण्यास सुरुवात
ट्रम्पशाहीला दणका देण्याची तयारी! अमेरिका आणि इराण युद्धामुळे अर्थव्यवस्थेवर प्रचंड दबाव; होरपळलेल्या आखाती देशांकडून अमेरिकेच्या गुंतवणूक करारांचा फेरविचार करण्यास सुरुवात
Nashik News: नाशिकमध्ये रंगपंचमीसाठी रहाडी सज्ज, पेशवेकालीन ऐतिहासिक परंपरेचा वारसा; 'धप्पा' मारण्यासाठी तरुणाईची उत्सुकता शिगेला
नाशिकमध्ये रंगपंचमीसाठी रहाडी सज्ज, पेशवेकालीन ऐतिहासिक परंपरेचा वारसा; 'धप्पा' मारण्यासाठी तरुणाईची उत्सुकता शिगेला
India vs New Zealand, Final T20 World Cup: टीम इंडियाला गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी पणवती म्हणून कायम चर्चेत; आज फायनलसाठी नेमका कोणता बदल केला? धक्कादायक खुलासा!
टीम इंडियाला गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी पणवती म्हणून कायम चर्चेत; आज फायनलसाठी नेमका कोणता बदल केला? धक्कादायक खुलासा!
Crime News: मंदिराच्या बाथरूममध्ये जिवलग मैत्रिणींनी संपवलं आयुष्य; भूल देण्याचे इंजेक्शन अन् इंटरनेटवर शोधल्या जीवन संपवण्याच्या पद्धती, घटनेनं खळबळ
मंदिराच्या बाथरूममध्ये जिवलग मैत्रिणींनी संपवलं आयुष्य; भूल देण्याचे इंजेक्शन अन् इंटरनेटवर शोधल्या जीवन संपवण्याच्या पद्धती, घटनेनं खळबळ
Pune Crime News : पुण्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ! नामंकित कॉलेजच्या विभागप्रमुखाने संपवलं जीवन; धक्कादायक कारण समोर
पुण्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ! नामंकित कॉलेजच्या विभागप्रमुखाने संपवलं जीवन; धक्कादायक कारण समोर
इन्स्टा Live करताना 150च्या स्पीडने गाडी डिव्हाडरला धडकली; रस्त्यावर तडफडताना दिसला 'बिग बॉस'फेम अभिनेता, मॅनेजरनं सांगितली परिस्थिती
इन्स्टा Live करताना 150च्या स्पीडने गाडी डिव्हाडरला धडकली; रस्त्यावर तडफडताना दिसला 'बिग बॉस'फेम अभिनेता, मॅनेजरनं सांगितली परिस्थिती
India vs New Zealand, Final T20 World Cup: टीम इंडियाला न्यूझीलंडच्या 'फाईव्ह स्टार राॅकेट'चा अडथळा! एकाचं सर्वात जलद शतक, दुसऱ्याने 3 अर्धशतके ठोकली अन् उर्वरित दोघांनी..
टीम इंडियाला न्यूझीलंडच्या 'फाईव्ह स्टार राॅकेट'चा अडथळा! एकाचं सर्वात जलद शतक, दुसऱ्याने 3 अर्धशतके ठोकली अन् उर्वरित दोघांनी..
Video: इस्त्रायलनं पहिल्यांदा गाझापट्टीत शाळा, दवाखाने, बाजारेपठ, नागरी वस्त्या संपवल्या; आता इराणमद्ये तेलसाठे नष्ट करण्यास सुरुवात, 30 इंधन टँक, तेल डेपो टार्गेट
Video: इस्त्रायलनं पहिल्यांदा गाझापट्टीत शाळा, दवाखाने, बाजारेपठ, नागरी वस्त्या संपवल्या; आता इराणमद्ये तेलसाठे नष्ट करण्यास सुरुवात, 30 इंधन टँक, तेल डेपो टार्गेट
Embed widget