एक्स्प्लोर

IND vs NED, 1st Inning Highlights : विराट-रोहितसह सूर्यानंही ठोकलं दमदार अर्धशतक, भारताकडून नेदरलँडला 180 धावांचं लक्ष्य

IND vs NED T20 : भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निवडली आहे. ज्यानंतर उत्कृष्ट फलंदाज करत भारतानं नेदरलँडसमोर धावांचं आव्हान ठेवलं आहे.

India vs Netherland, 1st Inning Highlights : ऑस्ट्रेलियातील सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर भारत विरुद्ध नेदरलँड (IND vs NED) सामना सुरु असून भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली.  ज्यानंतर विस्फोटक फलंदाजीच्या जोरावर 179 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. यावेळीी रोहित, विराटसह सूर्यकुमारनं अर्धशतक ठोकलं आहे. ज्यामुळे आता विजयासाठी नेदरलँडला 20 षटकांत 180 धावा करायच्या आहेत. 

पाकिस्तानवर विजयानंतर भारतीय संघाला ग्रुप 2 मध्ये आघाडी घेण्यासाठी आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. टीम इंडिया सध्या कमाल फॉर्मात असल्याने आज त्यांना एक मोठा विजय मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. ज्याच्या दृष्टीने त्यांनी नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी निवडली. एक मोठी धावसंख्या उभारुन नेदरलँडवर प्रेशर आणायचा आणि त्यांना स्वस्तात सर्वबाद करुन मोठ्या फरकाने सामना जिंकण्याचा डाव भारताचा आहे. अशामध्ये प्रथम फलंदाजी करत भारताने 179 धावा स्कोरबोर्डवर लावल्या आहे. भारताच्या चार फलंदाजांनी आज फलंदाजी केली, ज्यातील राहुल केवळ स्वस्तात (9 धावा) करुन बाद झाला. त्याच्याशिवाय इतर तीनही फलंदाजांनी अर्धशतकं ठोकली. यामध्ये कर्णधार रोहितने 39 चेंडूत 53 धावा केल्या. तर विराटनं 44 चेंडूत नाबाद 62 आणि सूर्यकुमारनं 25 चेंडूत नाबाद 51 धावा केल्या. दोघांनी नाबाद 95 धावांची भागिदारीही उभारली. नेदरलँडकडून फ्रेड आणि वॅन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. आता नेदरलँडचा संघ 20 षटकांत 180 धावा करण्यासाठी मैदानात उतरला आहे.

कशी आहे टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, आर अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह.

कसा आहे नेदरलँडचा संघ?

स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार/ विकेटकिपर), विक्रमजीत सिंह, मॅक्स ओडॉड, बास डी लीडे, कॉलिन अकरमन, टॉम कूपर, टिम प्रिंगल, लोगन व्हॅन बीक, शरीझ अहमद, फ्रेड क्लासेन, पॉल व्हॅन मीकरेन, 

भारत विरुद्ध नेदरलँड Head to Head

आजवर भारत आणि नेदरलँड दोघेही एकदिवसीय सामन्यात आमने-सामने आले असले तरी टी20 फॉर्मेटमध्ये दोन्ही संघाचा एकमेंकाविरुद्ध आजचा पहिलाच सामना असेल. नेदरलँड आणि भारत यांच्यात आजवर फक्त दोनच सामने झाले असून हे दोन्ही सामने टीम इंडियाने जिंकले आहेत. या दोन्ही संघांनी आधी फेब्रुवारी 2003 मध्ये पहिला सामना खेळला होता. या सामन्यात टीम इंडियाने 68 धावांनी विजय मिळवला. तर दुसरा सामना मार्च 2011 मध्ये झाला होता. भारताने हा सामना 5 विकेट्सनी जिंकला. ज्यानंतर आज दोघेही पहिलाच टी20 सामना ते देखील टी20 विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीमध्ये खेळत आहेत. 

हे देखील वाचा-

SA vs BAN, T20 World Cup 2022 : आधी रोसोची स्फोटक खेळी, मग नॉर्खियाची भेदक गोलंदाजी, दक्षिण आफ्रिकेचा बांग्लादेशवर 104 धावांनी विजय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget