एक्स्प्लोर

Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...

ड्रोनच्या घिरट्या आणि गावात होणाऱ्या चोऱ्यांमुळं आता ग्रामीण भागात या ड्रोनच्या धास्तीनं नागरिक चक्रावले होते. पण आता रात्री अपरात्री उडणाऱ्या ड्रोन नाट्यावर पोलिसांनीच पडदा टाकला आहे. 

Drone terror: गेल्या महिन्याभरापासून गावागावात रात्रीच्या वेळेला दिसणाऱ्या ड्रोनच्या दहशतीमुळे ग्रामीण भागात मोठी चर्चा होती. शेतशिवारात घराच्या छतावर रात्री अपरात्री ड्रोनच्या गिरट्या वाढल्याने नागरिक हैराण झाले होते. पण आता या ड्रोनच्या फेऱ्यांचा उलगडा झालाय. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण, सिल्लोड, गंगापूर, वैजापूर तालुक्यात उडणारे ड्रोन सर्वे करण्यासाठी उडवल्याचं समोर आलंय. दिल्लीतील एका खाजगी कंपनीकडून ड्रोन द्वारे सर्वे करण्यात येतोय. यासाठी पोलिसांनी लेखी परवानगीही दिल्याचं पोलिसांनी सांगितलंय. आता ड्रोन दिसला तर घाबरू नका असं आवाहनही पोलिसांनी केलं आहे. 

नक्की प्रकरण काय? 

गेला काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये रात्री अपरात्री ड्रोनच्या गिरटा वाढल्या होत्या. घरावर शेतावर अचानक एखादा ड्रोन येऊन निघून जायचा. हा ड्रोन नक्की कोण उडवताय किंवा कुठून आला आणि कशासाठी आला हे माहीत नसल्याने नागरिक धास्तावले होते. गावात चोऱ्याही वाढल्याने चोरीसाठीच या ड्रोन चा वापर होतोय अशी शंका बळवली होती. पण आता रात्री अपरात्री उडणाऱ्या या ड्रोन नाट्यावर पोलिसांनीच पडदा टाकला आहे. 

पोलिसांनी काय केला खुलासा? 

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कन्नड पैठण सिल्लोड वैजापूर या तालुक्यांमध्ये काही ठराविक गावांमध्ये द्रोनद्वारे शेती सर्वेक्षण करण्याकरता फोटो व शॉर्ट व्हिडिओ चित्रीकरण होणार होते. यासाठी पोलीस विभागाकडून दिल्लीतील खाजगी कंपनीला परवानगीही देण्यात आली होती. या परवानगी पत्रानुसार काही अनुचित घटना किंवा प्रकार घडल्यास त्याचे गंभीर पडसाद उमटू शकतात त्यामुळे हे चित्रे करण करताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी असेही नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या गावांमध्ये सर्वेक्षण करण्याकरता ड्रोन उडत असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. 

Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...

नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन 

आता रात्री अपरात्री ड्रोन दिसल्यास नागरिकांनी घाबरून जाऊ नये असा आवाहन पोलिसांनी नागरिकांना केला आहे. शेतीच्या सर्वेक्षणासाठी एका दिल्लीतील कंपनीला पोलिसांनी या सर्वेक्षणाची चित्रफीत बनवण्यासाठी परवानगी दिली होती. त्यामुळे चोर किंवा दरोडेखोर यांचा या ड्रोनशी काहीही संबंध नसल्याचं उघड झालं आहे. रात्री आठ ते दहा च्या दरम्यान अनेक जण आमच्या गावात ड्रोन दिसल्याची तक्रार करतात. पण हे ड्रोन सर्वेक्षणासाठी फिरत  असून निरूपद्रवी असल्याचं पोलिसांनी सांगितलं. 

रात्रीच का उडत होते ड्रोन? 

या कंपनीला दिलेल्या परवानगीनुसार सायंकाळी 6:00 वाजेपर्यंत त्यांना ड्रोन उडवण्याची परवानगी होती. पण काही लांब पल्ला असणाऱ्या गावात ड्रोन पोचण्यास उशीर होत असेल तिथे रात्रीही ड्रोन उडवले जात होते. असं पोलिसांनी सांगितले. या संपूर्ण विषयाची पडताळणी सध्या पोलिसांकडून सुरू असून अँटिड्रोजन चाचण्या हे करणार असल्याचं सांगण्यात आलंय. 

कोण आणि कशासाठी करतंय सर्वेक्षण ?

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार सप्तर्षी सर्विसेस नावाच्या दिल्लीच्या कंपनीचे हे ड्रोन आहेत . या कंपनीने ड्रोन उडवण्याची परवानगी घेतली आहे . हा सर्वे केंद्र शासनाच्या प्रोजेक्ट चा भाग असल्याचं ही प्रशासनाने सांगितलं आहे.

परवानगीशिवाय ड्रोन उडवत असाल तर सावधान

रात्री अपरात्री नागरिकांमध्ये धास्ती पसरवणाऱ्या ड्रोनच्या फेऱ्या थांबवण्यासाठी पोलिसांना कडक कारवाईचा इशारा देण्यात आलाय. या कंपनीने रीतसर परवानगी घेतल्याने सध्या ड्रोन उडत असून यामध्ये जर काही हौशी ड्रोन उडवत असतील तर त्याची पडताळणी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.ज्यांचे ड्रोन असतील त्यांनी प्रशासनाच्या परवानगी आवश्यक असल्याचं ते म्हणाले .

हेही वाचा:

Drone Fear: हायटेक चोरांचा राज्यभर धुमाकूळ, ड्रोनच्या घिरट्या वाढल्यानं ग्रामीण भागातील नागरिक गोंधळले, नक्की प्रकरण काय?

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?

व्हिडीओ

Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
Chandrapur Farmer :कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी? शेतकऱ्याचा धक्कादायक दावा Special Report
Navneet Rana : पक्ष की पती? नवनीत राणांची कुणाशी सहमती? भाजप राणांना झापणार की जपणार? Special Report
Ajit Pawar : तोंडी परीक्षा, उमेदवारीची प्रतीक्षा, इच्छुकांवर प्रश्नांची सरबत्ती Special Report
Shivaji Park Sabha:शिवाजीपार्कसाठी रस्सीखेच,शिवाजी पार्क मैदानावर कुणाचा आवाज घुमणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
Prithviraj Chavan VIDEO: राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
Girish Mahajan: साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एकही अवाक्षर खपवून घेणार नाही: गिरीश महाजन
साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एक अवाक्षरही खपवून घेणार नाही: गिरीश महाजन
Embed widget