(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Virat Kohli: विराट अॅडिलेडचा नवा बादशाह, दिग्गज क्रिकेटपटू ब्रायन लाराचा विश्वविक्रम मोडला!
इंग्लंडविरुद्ध टी-20 विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं (Virat Kohli) अर्धशतकीय खेळी केली. मात्र, त्याची ही खेळी भारतीय संघाला विजय मिळवून देण्यास अपयशी ठरली.
T20 World Cup 2022: इंग्लंडविरुद्ध टी-20 विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये (India vs England) भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं (Virat Kohli) अर्धशतकीय खेळी केली. मात्र, त्याची ही खेळी भारतीय संघाला विजय मिळवून देण्यास अपयशी ठरली. या सामन्यात भारताला 10 विकेट्सनं दारूण पराभव स्वीकारावा लागला. परंतु, या सामन्यात भारतासाठी 50 धावांचं योगदान देणाऱ्या विराट कोहलीच्या नावावर खास विक्रमाची नोंद झालीय. विराट कोहली परदेशात अॅडलेड (Adelaide) ओव्हलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लाराचा (Brian Lara) विक्रम मोडत कोहलीनं हे स्थान गाठले.
विराट कोहलीनं (Virat Kohli) अॅडलेडमध्ये तिन्ही फॉरमॅट एकूण 957 धावा केल्या आहेत. या मैदानात विराटनं कसोटीत कसोटीत 509, वनडेमध्ये 244 आणि टी-20मध्ये 204 धावा केल्या आहेत. यापूर्वी हा विक्रम ब्रायन लारा (Brian Lara) यांच्या नावावर होता. या मैदानावर खेळताना ब्रायन लाराच्या बॅटमधून 940 धावा निघाल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये विराटच्या 4000 धावा पूर्ण
विराट कोहलीनं टी-20 विश्वचषकाच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये 50 धावांची खेळी केली. ज्यात चार चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. इंग्लंडविरुद्ध सामन्यात 42 धावांवर पोहचताच विराटच्या नावावर खास विक्रम नोंदवला गेला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4000 धावांचा टप्पा गाठला. हा टप्पा गाठणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. विराटनं भारतासाठी आतापर्यंत 115 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने 52.74 च्या अप्रतिम सरासरीने 4008 धावा केल्या आहेत.
टी-20 विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर विराटची भावनिक पोस्ट
भारतीय संघ टी-20 विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर विराट कोहलीनं त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक इमोशनल ट्वीट केलं. ज्यात त्यानं असं म्हटलंय की, "आपलं स्वप्न पूर्ण न करताच आम्ही निराश मनानं ऑस्ट्रेलिया सोडत आहोत. पण एक गट म्हणून आम्ही आमच्यासोबतचे अनेक अविस्मरणीय क्षण सोबत घेऊन जातोय. आमच्या खेळात आणखी सुधारणा करण्याचं आमचं ध्येय आहे. स्टेडियममध्ये आम्हाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येनं आलेल्या आमच्या सर्व चाहत्यांचे आभार. ही जर्सी घालून आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करण्याचा नेहमीच अभिमान वाटतो."
हे देखील वाचा-