एक्स्प्लोर
Advertisement
वन डे रँकिंगमध्ये विराट पहिल्या, तर रोहित दुसऱ्या क्रमांकावर
वन डे फलंदाजांच्या रँकिंगमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आता भारतीय फलंदाजांनी कब्जा केला आहे. रोहित शर्माने नुकत्याच झालेल्या आशिया चषकात 105.66 च्या सरासरीने 317 धावा केल्या.
मुंबई : आशिया चषकात भारतीय संघाचं यशस्वीपणे नेतृत्त्व केल्यानंतर रोहित शर्मासाठी आणखी एक खुशखबर आहे. आयसीसीकडून जारी फलंदाजांच्या ताज्या वन डे रँकिंगमध्ये रोहितने मोठी झेप घेतली आहे. रोहित शर्मा फलंदाजांच्या वन डे रँकिंगमध्ये पहिल्यांदाच दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
रोहितच्या पुढे आता फक्त भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली आहे. त्यामुळे वन डे फलंदाजांच्या रँकिंगमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आता भारतीय फलंदाजांनी कब्जा केला आहे.
विराट कोहलीच्या खात्यात 884 गुण आहेत, तर रोहितच्या नावावर 842 गुण आहेत. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर ज्यो रुट (818), चौथ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर (803) आणि पाचव्या क्रमांकावर शिखर धवन (802) आहे.
रोहित शर्माने नुकत्याच झालेल्या आशिया चषकात 105.66 च्या सरासरीने 317 धावा केल्या.
रोहितशिवाय फॉर्मात असलेल्या शिखर धवनलाही चार स्थानांचा फायदा झाला आहे. तो आता पाचव्या क्रमांकावर आला आहे. धवनने आशिया चषकात पाच डावांमध्ये 342 धावा केल्या, ज्यात दोन शतकांचा समावेश आहे. धवन आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या वॉर्नर यांच्यात केवळ एका गुणाचा फरक आहे. त्यामुळे संध्या बंदीची कारवाई भोगत असलेल्या वॉर्नरवर मात करत धवन पुढे जाईल यात शंका नाही.
जसप्रीत बुमरा गोलंदाजांच्या यादीत पहिल्या स्थानावर कायम आहे. त्याच्या खात्यात 797 गुण आहेत. आशिया चषकात 10 विकेट घेणाऱ्या कुलदीप यादवने कारकीर्दीत पहिल्यांदाच 700 गुण घेत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. दुसऱ्या स्थानावर अफगाणिस्तानचा स्टार खेळाडू रशिद खान (788) आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
ठाणे
विश्व
Advertisement