एक्स्प्लोर
रुटला आऊट देण्यावर आक्षेप, अंपायरविरुद्ध इंग्लंडची तक्रार

नागपूर: भारताविरुद्धच्या टी ट्वेण्टी सामन्यात पंचांच्या ढिसाळ निर्णयाचा फटका बसल्याची खंत इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गनने व्यक्त केली. त्यामुळेच इंग्लंडचा संघ अंपायर शमशुद्दीन यांची तक्रार करण्याच्या तयारीत आहे.
विराट कोहलीच्या टीम इंडियानं नागपूरच्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात इंग्लंडवर पाच धावांनी सनसनाटी विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.
मात्र या विजयानंतर अंपायर शमशुद्दीन यांच्या एका निर्णयाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
अंपायरचा निर्णय काय होता?
इंग्लंडला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी आठ धावांचीच आवश्यकता होती. भारताकडून जसप्रीत बुमराह ती ओव्हर टाकत होता. तमाम भारतीयांची धाकधूक वाढत असताना सर्वांच्या नजरा बुमराहवर होत्या. बुमराहने पहिल्याच बॉलवर ज्यो रुटला चकवा दिला. बॉल त्याच्या पॅडवर जाऊन आदळल्याचं सर्वांनी पाहिलं. भारतीय खेळाडूंनी अपिल केली आणि अंपायर शमशुद्दीन यांनी आऊट दिलं.
खरं तर बॉल ज्यो रुटच्या पॅडवर आदळण्यापूर्वी त्याच्या बॅटची कडा घेऊन गेल्याचं रिप्लेमध्ये दिसलं.
अंपायरच्या निर्णयावर ज्यो रुटनेही संताप व्यक्त केला होता. कारण रुट सेट फलंदाज होता आणि इंग्लंडला गरज होती त्याचवेळी त्याची विकेट गेली. त्यामुळे हा सामना भारताच्या बाजूने झुकला.
त्यानंतर बुमराहच्या दुसऱ्या चेंडूवर 1 रन घेतली आणि बटलर स्ट्राईकवर आला. त्यावेळी इंग्लंडला 4 चेंडूवर 7 धावांची गरज होती.
मग बुमराहने धीम्या गतीने टाकलेला चेंडू बटलरने वाया घालवला. त्यामुळे इंग्लंडला 3 चेंडूवर 7 धावांची गरज होती.
त्यानंतर मग बुमराहने पुढच्याच चेंडूवर बटलरला क्लीनबोल्ड करुन इंग्लंडच्या उरल्या-सुरल्या आशा धुळीस मिळवल्या.
त्यानंतर इंग्लंडला दोन चेंडूत 7 धावांची गरज होती. बुमराहने तो चेंडू ऑफ कटर फेकला. त्यावेळी फलंदाज जॉर्डन चकला मात्र त्याने 1 धाव घेतली.
शेवटच्या चेंडूवर इंग्लंडला विजयासाठी 6 धावांची गरज होती. त्यावेळी मोईन अली स्ट्राईकवर होता. बुमराहने त्यालाही चकवल्यामुळे भारताने हा सामना 5 धावांनी जिंकला.
ज्यो रुटने इंग्लंडला विजयापर्यंत आणलं होतं. ज्यो रुट मैदानावर असल्यामुळे, हा सामना सहज जिंकू अशी आशा इंग्लंडला होती.
मात्र अंपायरच्या चुकीच्या निर्णयाचा फटका ज्यो रुटला आणि पर्यायाने संघाल बसल्याची भावना इंग्लंडची आहे.
दुसरीकडे गच्च भरलेल्या मैदानात, अटीतटीच्या लढतीत अंपायरिंग करणं तितकंस सोपं नसतं, हे सुद्धा यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झालं.
सोशल मीडियावर ट्रोल
दरम्यान, अंपायर शमशुद्दीन यांच्या या निर्णयामुळे ट्विटरवरुन त्यांच्यावर निशाणा साधण्यात येत आहे.
https://twitter.com/CricketToll/status/825933873284423681
संबंधित बातम्या

राहुलने सेहवाग, युवराजचा 10 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
बुमराचे शेवटचे सहा बॉल, ज्यामुळे हिरो बनला!भारताचा इंग्लंडवर सनसनाटी विजय, बुमरा विजयाचा शिल्पकार
नेहराचा बुमराला सल्ला अन् टीम इंडिया विजयी!
नेहराला माहित होतं, पण बुमरा प्रत्येकवेळी… : कोहली
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
शेत-शिवार
बीड
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement