Paris Olympics : 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र! पहिल्याच प्रयत्नात 88.77 मीटर लांब भालाफेक, ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत दाखल
World Athletics Championships Final : ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 88.77 मीटर लांब भाला फेकत अंतिम फेरीत मजल मारली आहे. यासोबतच तो पॅरिस ऑलिम्पिकसाठीही पात्र ठरला आहे.
मुंबई : भारताचा 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राने (Neeraj Chopra) जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये (World Athletics Championships 2023) दमदार कामगिरीसह थेट अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यासोबतच नीरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठीही पात्र ठरला आहे. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 88.77 मीटर लांब भाला फेकत अंतिम फेरीत मजल मारली आहे. जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपचा अंतिम सामना (World Athletics Championships Final) 27 ऑगस्ट रोजी होणार असून यामध्ये एकूण 12 खेळाडू सहभागी होणार आहेत.
नीरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र
हंगेरीची राजधानी बुडापेस्टमध्ये वर्ल्ड ॲथलेटिक्स स्पर्धा सुरु आहे. सध्या क्वॉलिफिकेशन राउंड म्हणजेच पात्रता फेरी सुरु आहे. नीरज चोप्रा जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारा पहिला ॲथलिट ठरला आहे. त्यासोबतच नीरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिकसाठीही पात्र ठरला आहे.
नीरज चोप्राला 'सुवर्ण कामगिरी' करण्याची संधी
अंतिम फेरीत स्थान मिळविण्यासाठी खेळाडूला किमान 83 मीटर अंतरावर भाला फेकावा लागतो नीरजने पहिल्याच प्रयत्नात दमदार थ्रो केला आणि अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत भारताला या स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई करता आलेली नाही. त्यामुळे आता नीरज चोप्राला भारतासाठी 'सुवर्ण कामगिरी' करण्याची संधी आहे. 2003 मध्ये अंजू बॉबी जॉर्जने कांस्य पदकाची कमाई केली होती. तर, गेल्या वर्षी नीरज चोप्राचं सुवर्ण पदक थोडक्यातच हुकलं होतं, त्यामुळे त्याला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं होतं. पण, यावेळी नीरज चोप्राचं लक्ष्य सुवर्ण पदकावर आहे.
Neeraj Chopra qualified for the Paris Olympics 2024....!!!
— Johns. (@CricCrazyJohns) August 25, 2023
His first throw of 88.77M at World Championship - The Golden Boy of 🇮🇳 pic.twitter.com/OGl4ri5Asp
नीरज चोप्रा सुवर्णपदकाचा प्रबळ
नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 88.77 मीटर भालाफेक करून थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. इतकंच नाही तर नीरज गुणतालिकेतही अव्वल स्थानी पोहोचला आहे. नीरज चोप्रा या स्पर्धेत सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार आहे. या थ्रोनंतर तो दुसऱ्या थ्रोसाठीही परतला नाही. त्याचा हा थ्रो यंदाच्या हंगामातील त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.
पाहा व्हिडीओ : नीरज चोप्राची प्रतिक्रिया
Neeraj Chopra's reaction after securing Olympic qualification with an 88.77 m throw in the #WorldAthleticsChampionships2023.
— Boria Majumdar (@BoriaMajumdar) August 25, 2023
Listen in 👇.@Limca_Official @Neeraj_chopra1 @g_rajaraman #NeerajChopra pic.twitter.com/TceXi3K7hc
डीपी मनूकडून तिसऱ्या प्रयत्नात 72.40 मीटर लांब भालाफेक
भारतीय भालाफेकपटू डीपी मनूने तिसऱ्या प्रयत्नात 72.40 मीटर थ्रो केला. त्याची सर्वोत्तम 81.31 मी. त्याला अंतिम फेरीसाठी पात्रता गुण मिळवता आलेले नाही, पण तो गट-अ मधून तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांच्या वर नीरज चोप्रा (88.77 मीटर) आणि ज्युलियन वेबर (82.39 मीटर) आहेत.
डीपी मनूने दुसऱ्या प्रयत्नात 81.31 मीटर लांब भालाफेक
डीपी मनूने दुसऱ्या प्रयत्नात 81.31 मीटर भालाफेक केली. तरीही त्याला अंतिम फेरीत स्थान मिळवता आलेलं नाही. अंतिम फेरीत थेट पात्रता मिळवण्यासाठी 83 मीटर भालाफेक करावी लागते.