एक्स्प्लोर

IPL 2023, MI : मुंबई इंडियन्सची 'यंग ब्रिगेड'! तिलक वर्मा, नेहाल वढेरासह 'या' तरुण खेळाडूंचा भरणा

IPL 2023 MI Young Squad : मुंबई इंडियन्सच्या संघात यंदा दिग्गज खेळाडूंसोबतच तरुण खेळाडूंचा अधिक भरणा पाहायला मिळत आहे. मुंबईत तिलक वर्मा, नेहाल वढेरासह 10 तरुण खेळाडू आहेत.

IPL 2023 Mumbai Indians Young Players : यंदाच्या आयपीएलच्या (IPL 2023) मोसमाला सुरुवात झाली आहे. सर्व संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. आयपीएल 2023 च्या पहिल्या सामन्यात मुंबईचा आरसीबीकडून पराभव झाला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मुंबई इंडियन्सवर आठ विकेट्सने विजय मिळवला.

IPL 2023 MI Young Squad : मुंबई इंडियन्सची 'यंग ब्रिगेड'

दरम्यान, मुंबई इंडियन्सच्या संघावर नजर टाकली तर, मुंबई इंडियन्सच्या संघात यंदा दिग्गज खेळाडूंसोबतच तरुण खेळाडूंचा अधिक भरणा पाहायला मिळत आहे. मुंबईत तिलक वर्मा, नेहाल वढेरासह 10 तरुण खेळाडू आहेत. त्यामुळे मुंबई संघ अनुभवी खेळाडूंच्या हाताखाली भविष्यासाठी दमदार खेळाडू तयार करत असल्याचं दिसून येतं.

Mumbai Indians Team : मुंबई इंडियन्स संघ

रोहित शर्मा, संदीप वॉरियर, सूर्यकुमार यादव, इशान किशन, देवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा, जोफ्रा आर्चर, टिम डेव्हिड, मोहम्मद अर्शद खान, रमणदीप सिंग, हृतिक शोकीन, अर्जुन तेंडुलकर, ट्रिस्टन स्टब्स, कुमार कार्तिकेय, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश माधवाल, आकाश माधव. ग्रीन, झ्ये रिचर्डसन, पियुष चावला, दुआन जॅनसेन, विष्णू विनोद, शम्स मुलानी, नेहल वढेरा, राघव गोयल

 

Tilak Verma : तिलक वर्मा

तिलक वर्माने आरसीबी विरुद्धच्या सामन्यात तुफान खेळी केली. 20 वर्षीय तिलक वर्माने 84 धावांची झंझावाती खेळी केली. मुंबईचे हार्ड हिटर फोल ठरल्यावर डावखुरा फलंदाज टिळक वर्मा याने एकहाती जबाबदारी स्वीकारली. त्याने 46 चेंडूत नऊ चौकार आणि चार षटकारांसह नाबाद 84 धावा केल्या. वर्माने षटकार ठोकत 32 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. आयपीएल 2022 मध्ये तिलक वर्माच्या दमदार फलंदाजीने सर्वांनाच प्रभावीत केलं होतं. 

Nehal Wadhera : नेहाल वढेरा

पदार्पणाच्या सामन्यातच मुंबईच्या 22 वर्षीय नेहाल वढेरा याने सर्वांची मने जिंकली. नेहालने पदार्पणाच्या सामन्यात 13 चेंडूत 21 धावांची प्रभावी खेळी केली. या खेळीदरम्यान नेहालची चर्चा सुरु झाली. नेहाल वढेरा याने आरसीबीविरोधात 101 मीटरचा गगनचुंबी षटकार लगावला. हा चेंडू बेंगलोरच्या स्टेडिअमवर गेला. कर्ण शर्माच्या गोलंदाजीवर नेहाल वढेरा याने लागोपाठ दोन षटकार लगावले. त्यामधील एक चेंडू  स्टेडिअवर बाहेर गेला. 

Dewald Brevis : डेवाल्ड ब्रेव्हिस

डेवाल्ड ब्रेव्हिस याला यंदा आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्स संघात घेतलं. डेवाल्ड ब्रेव्हिस दक्षिण आफ्रिकन संघातील क्रिकेटर (South African Cricketer) आहे. त्याने अधिक सामने खेळले नाहीत पण काही सामन्यात चुणूक नक्कीच दाखवली. त्याला दक्षिण आफ्रिकेचा जुनियर एबी डिव्हिलियर्स म्हणून ओळखलं जातं. मुंबई इंडियन्स संघाकडून आयपीएल 2023 मध्ये कमाल करेल अशी आशा आहे. 

Kumar Kartikeya : कुमार कार्तिकेय

उत्तर प्रदेशमध्ये जन्मलेला 25 वर्षीय कुमार कार्तिकेय आयपीएलच्या मागील हंगामात जखमी अर्शद खानचा बदली खेळाडू म्हणून मुंबई इंडियन्सचा भाग बनला. डावखुऱ्या फिरकीपटूने मागील मोसमात शानदार गोलंदाजी केली. आयपीएल 2022 मध्ये कार्तिकेयने खेळलेल्या चार सामन्यांमध्ये, पाच विकेट्स घेतल्या. या हंगामातत रोहित शर्मा संघातील गोलंदाजाचा कसा उपयोग करून घेतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. त्याने टी-20 सामन्यात 8 विकेट्स घेतल्या आहेत. त्याला मुंबईच्या संघानं 20 लाखात खरेदी केलं आहे. कुमार कार्तिकेय सिंह (वय 25 वर्ष) देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशचं प्रतिनिधित्व करतो. 

Ishan Kishan : ईशान किशन

इशान किशन 24 वर्षांचा असून त्याने भारतीकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. ईशान यष्टिरक्षक आणि फलंदाज म्हणून खेळतो. त्याने मार्च 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. ईशान देशांतर्गत क्रिकेटमध्ये झारखंड संघाकडून खेळतो.

Arshad Khan : अर्शद खान

25 वर्षीय अष्टपैलू खेळाडू अर्शद खानने आरसीबीविरोधातील सामन्या आयपीएलमध्ये पदार्पण केलं आहे. बुमराहची कमतरता अर्शद खानने भरून काढली. अर्शद खान मूळचा मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील गोपालगंज येथील आहे. अर्शदला मुंबई इंडियन्सने 20 लाख रुपयांच्या मूळ किमतीत विकत घेतलं आहे. तो ए लिस्ट सामने खेळला आहे.

Ramandeep Singh : रमनदीप सिंह

25 वर्षीय रमनदीप सिंह उजव्या हाताचा फलंदाज आणि उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज आहे. आयपीएल 2023 मध्ये त्याने मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केलं आहे. रमनदीप देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंजाबकडून खेळतो. तो ए लिस्ट क्रिकेट खेळतो.

Cameron Green : कॅमेरॉन ग्रीन

ऑस्ट्रेलियन अष्टपैलू क्रिकेटपटू कॅमेरॉन ग्रीनचा हा पहिला आयपीएल हंगाम आहे, तो याआधी आयपीएल खेळलेला नाही. IPL 2023 च्या लिलावात मुंबई इंडियन्सने कॅमेरॉन ग्रीनला 17.50 कोटी रुपयांना विकत घेतले. यंदाच्या सीझनमध्ये सॅम करननंतर कॅमेरॉन दुसरा महागडा खेळाडू आहे. पंजाब किंग्जने सॅम कुरनला तब्बल 18.50 कोटी रुपयांना विकत घेतलं आहे. तर मुंबईने कॅमेरॉनला 17.50 कोटी रुपयांना विकत घेतलं. कॅमेरॉन ग्रीनग्रीन यापूर्वी कधीही आयपीएलमध्ये दिसला नव्हता आणि हा त्याचा पहिला हंगाम असेल. कॅमेरॉनने ऑस्ट्रेलियासाठी टी 20 मध्ये 173.75 च्या स्ट्राइक रेटने 139 धावा केल्या आहेत.

Tristan Stubbs : ट्रिस्टन स्टब्स 

ट्रिस्टन स्टब्स दक्षिण आफ्रिकेचा युवा खेळाडू आहे. 21 वर्षीय स्टब्स विकेटकिपर फलंदाज आहे. विस्फोटक खेळी करण्यासाठी स्टब्सला ओळखले जाते. स्थानिक क्रिकेटमध्ये स्टब्सने विक्रमी फलंदाजी केली. स्टब्सने नुकत्याच झालेल्या सीएसए चॅलेंज टूर्नामेंटमध्ये वॉरियर्सकडून खेळताना 183.12 च्या स्ट्राइक रेटने धावांचा पाऊस पाडलाय.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Shinde Satara Speech : खरी शिवसनेना कुणाची हे सिद्ध झालंय, मुख्यमंत्र्यांचं साताऱ्यात जोरदार भाषणBhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
Embed widget