एक्स्प्लोर

मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 

Shivsena UBT : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव अनिल देसाई यांनी मिलिंद देवरा यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार केली आहे.

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अनिल देसाई यांनी निवडणूक आयोगाकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे राज्यसभा खासदार आणि वरळीचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्या विरोधात तक्रार केली आहे. मिलिंद देवरा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना काढण्यात आलेल्या शोभायात्रेत 500 रुपये देऊन लोकांना सहभागी करुन घेण्यात आल्याचं त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर मान्य केल्याची तक्रार अनिल देसाई यांनी केली आहे. अनिल देसाई यांनी मिलिंद देवरा यांच्यावर आचारसंहिता भग केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

नेमकं प्रकरण काय?  

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून अनिल देसाई यांनी मिलिंद देवरा यांच्या विरोधात मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. मिलिंद देवरा यांनी उमेदवारी अर्ज  दाखल करताना शोभायात्रा काढली होती. त्या शोभायात्रेचे व्हिडीओ जोडत तक्रार करण्यात आली आहे. अनिल देसाईंच्या पत्रामध्ये शोभायात्रेचे चित्रीकरण करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींनी त्या शोभायात्रेत सहभागी झालेल्या लोकांना विचारलं असता त्यांनी आपल्याला प्रत्येकी 500 रुपये देऊन शोभायात्रेत सहभागी होण्यास सांगितल्याचं कॅमेऱ्यासमोर कबूल केल्याचा उल्लेख आहे.  या प्रकरणाचे असंख्य व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाल्याचं देखील देसाईंच्या पत्रात म्हटलं आहे. 
 
निवडणूक आदर्श आचारसंहितेसंदर्भातील भारतीय राज्यघटनेच्या कलमानुसार पैशाचे आमिष दाखविणे हा गंभीर गुन्हा असून  या गोष्टीची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आचारसंहिता भंग प्रकरणी कठोर कारवाईचे निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी अनिल देसाई यांनी केली आहे. 

याशिवाय  बेकायदेशी खर्च वरळी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार मिलिंद देवरांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करावा, अशी मागणी देखील अनिल देसाई यांनी केली आहे. 

मनसेनंतर मिलिंद देवरा सेनेच्या निशाण्यावर

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीनं दादरमधील शिवाजी पार्क मैदानावरील दीपोत्सव कार्यक्रमातील पक्षाच्या नावाच्या आणि चिन्हाच्या वापरासंदर्भात तक्रार केली होती. दीपोत्सवाचा खर्च अमित ठाकरे यांच्या निवडणूक खर्चात दाखवण्यात यावा अशी मागणी देखील करण्यात आली होती. त्यानंतर निवडणूक आयोगानं त्याची दखल घेत कारवाई करण्याचे आदेश दिले होते. आता  ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा आले आहेत. आता निवडणूक आयोग काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

दरम्यान, अनिल देसाई यांच्या तक्रारीनंतर राज्य निवडणूक आयोगानं 24 तासात याची पडताळणी करावी आणि कार्यवाही अहवाल  द्यावा असे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

इतर बातम्या :

मोठी बातमी : लोकसभेला काँग्रेसमधून शिंदेंच्या शिवसेनेत, आता विधानसभेला भाजपात प्रवेश, राजू पारवेंचा धक्का

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणतात मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणतात मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Manoj Jarange : अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM Modi Speech ISKON Temple Navi Mumbai भारताला समजून घेण्यासाठी अध्यात्म समजून घेणं महत्वाचं : मोदीPankaja Munde on Beed : बीडमधील तणाव कसा कमी होणार? पंकजा मुंडे म्हणाल्या..Walmik Karad Court Case : महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला विनंती आहे! दवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यात याWalmik Karad Court : वाल्मिक कराडला कोर्टातून बाहेर आणताच काय घडलं? संपूर्ण व्हिडीओ...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणतात मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणतात मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Manoj Jarange : अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली!
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली
Embed widget