IPL 2023 Points Table : बंगळुरुचा मुंबईवर दणदणीत विजय, पॉईंट्स टेबलमध्ये कोण आहे पहिल्या स्थानावर
IPL 2023 Points Table : आयपीएलच्या 2023 मध्ये सर्व संघानी हंगामात आतापर्यंत प्रत्येकी 1-1 सामने खेळले आहेत. त्यानंतर राजस्थान पॉईंट्स टेबलवर पहिल्या क्रमांकावर आहे तर लखनौ आणि बंगळुरू दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
IPL 2023 Points Table Update : इंडियन प्रीमियर लीगचा 2023 (Indian Premier League) हंगाम दणक्यात सुरू झाला आहे. सुपर संडे डबल हेडरच्या पहिल्या सामन्या राजस्थान रॉयल्सने सनरायर्स हैदराबादने जिंकला, तर दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मुंबई इंडियन्सचा 8 विकेट्सने एकतर्फी पराभव केला. आयपीएलच्या 2023 मध्ये सर्व संघानी हंगामात आतापर्यंत प्रत्येकी 1-1 सामने खेळले आहेत. त्यानंतर राजस्थान रॉयल्स पॉईंट्स टेबलवर पहिल्या क्रमांकावर आहे तर लखनौ आणि बंगळुरू दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
IPL 2023 Points Table Update : राजस्थान पॉईंट्स टेबलवर पहिल्या स्थानी
राजस्थान रॉयल्स संघाने सनरायर्स हैदराबाद विरोधातील सामना विक्रमी धावांच्या फरकाने जिंकला. राजस्थानने हैदराबादचा 72 धावांनी पराभव केला. यासोबतच राजस्थान रॉयल्स संघाने आयपीएल पॉईंट्स टेबलवर पहिलं स्थान मिळवलं आहे. राजस्थान रॉयल्स संघाकडे 2 गुण असून नेट रनरेट 3.600 आहे. यानंतर, लखनौ सुपर जायंट्स संघ पॉईंट्स टेबलवर दुसऱ्या स्थानावर आहे. लखनौ संघाने त्यांच्या पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाचा 50 धावांनी पराभव केला. सध्या लखनौ संघाचा नेट रन रेट 2.500 आहे.
𝐃𝐈𝐒𝐏𝐀𝐓𝐂𝐇𝐄𝐃! 🚀
— IndianPremierLeague (@IPL) April 2, 2023
That one lands straight into the stands 👋🏻
Follow the match ▶️ https://t.co/ws391sGhme#TATAIPL | #RCBvMI pic.twitter.com/BksCCnbube
IPL 2023 Points Table Update : बंगळुरु पॉईंट्स टेबलवर तिसऱ्या स्थानावर
मुंबई इंडियन्सवरील दमदार विजयानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु पॉईंट्स टेबलवर तिसऱ्या स्थानावर आहे. 2 गुणांसह बंगळुरूचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे आणि त्यांचा नेट रनरेट 1.981 आहे. यानंतर चौथ्या स्थानावर गतविजेता गुजरात टायटन्स संघ आहे. गुजरातने पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा पाच विकेट्सने पराभव केला. गुणतालिकेत सध्या गुजरात संघाचा नेट रनरेट सध्या 0.514 आहे.
An 8⃣-wicket victory at home to kick off the season in style 👌👌@RCBTweets are up and running in #TATAIPL 2023 🙌
— IndianPremierLeague (@IPL) April 2, 2023
Scorecard ▶️ https://t.co/ws391sGhme#TATAIPL | #RCBvMI pic.twitter.com/NlqIbjqHdC
IPL 2023 Points Table Update : 10 संघामध्ये चुरशीची लढत
यंदा इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या हंगामाला सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षी प्रमाणेच यंदाही या आयपीएलमध्ये 10 संघ सहभागी झाले असून त्यांच्या चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने सर्वाधिक पाच वेळा आयपीएल विजेता ठरला आहे, तर चेन्नई सुपर किंग्स धोनीच्या नेतृत्वाखाली चार चॅम्पियन बनला आहे. गुजरात टायटन्स गतविजेता संघ आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सचा पराभव करून गुजरातने विजेतेपद पटकावलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
IPL 2023 : पदार्पणाच्या सामन्यातच स्टेडिअमबाहेर मारला चेंडू, मुंबईचा 22 वर्षीय बिग हिटर कोण?