कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर ओमनी गाडीने पेट घेतला त्यानंतर भीषण आग लागली. त्यात गॅस भरणाऱ्याचे दुकान तसेच एक दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली आहे.
जळगाव : पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा इंधन भरताना दुर्घटना झाल्याचं यापूर्वी पाहायला मिळालं आहे. मात्र, जळगावमध्ये वाहनात गॅस भरताना सिलेंडरचा स्पोट होऊन ओमिनी गाडी जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत गॅस भरणारे 3 जण आणि गाडीमालक असे चार जण गंभीररीत्या भाजले गेले आहेत. विशेष म्हणजे बेकायदेशीररित्या तसेच अवैध पद्धतीने वाहनात गॅस भरला जात होता, त्यातूनच ही गंभीर घटना घडली असल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, दुर्घटनेतील जखमींना
सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर ओमनी गाडीने पेट घेतला त्यानंतर भीषण आग लागली. त्यात गॅस भरणाऱ्याचे दुकान तसेच एक दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. या आगीच्या दुर्घटनेत भाजलेल्या चारही जणांना रुग्णालयात हलवण्यात आलेलं असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. याबाबत घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन बंबाने घटनास्थळ गाठून आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत संपूर्ण ओमिनी कार आणि दूचाकी, व दुकान पूर्णपणे जळून खाक झाले होते.