एक्स्प्लोर

Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार

Eknath Shinde: कोविड होता तेव्हा शंभूराजे वणवण फिरला, दरड कोसळली कि तो वणवण फिरला. शंभूराजे यांनी 2900 कोटी रुपये निधी आणण्याचे काम मतदारसंघासाठी केलं आहे.

सातरा : महायुती सरकारने राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Ladki bahin yojana) योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून अडीच कोटी महिला भगिनींना थेट लाभ मिळाला आहे. लाडक्या बहिणींना सक्षम करण्यासाठी आम्ही ही योजना सुरू केली आहे, मात्र या योजनेला विरोध करण्यासाठी काही मंडळी कोर्टात गेली आहेत. त्यामुळे तुमच्या योजनेत खोडा घालणाऱ्यांना आपण कोल्हापरी जोडा नक्की दाखवाल असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. या भागाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी महायुती कटिबद्ध असून त्यासाठी कधीही निधीची कमतरता जाणवू देणार नाही अशी ग्वाही देखील प्रचारसभांमध्ये दिली. जन्मभूमीत कार्यक्रम असतो तेव्हा तो आनंद वेगळा असतो, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) सातारा जिल्ह्यातील पाटण विधानसभा मतदारसंघात मंत्री आणि शिवसेना उमेदवार शंभूराजे देसाई यांच्या प्रचाराचा नारळ फोडला. याप्रसंगी लाडकी बहीण योजनेसाठी किंवा सर्वसामान्यांसाठी मी 100 वेळा तुरुंगात जायला तयार असल्याचंही त्यांनी म्हटलं. 

कोविड होता तेव्हा शंभूराजे वणवण फिरला, दरड कोसळली कि तो वणवण फिरला. शंभूराजे यांनी 2900 कोटी रुपये निधी आणण्याचे काम मतदारसंघासाठी केलं आहे. गेल्या अडीच वर्षात हे आमदार वणवण फिरत होते, आम्हाला निधी द्या. पण, पूर्वीचे सरकार हे बहिरे होते, घरात बसून फेसबुक लाईव्ह करून सरकार चालत नसते, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. त्यानंतर, लाडकी बहीण योजनेची माहिती देत आपण तुरुंगातही जायला तयार असल्याचं म्हटलं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना आर्थिक स्वातंत्र्य व पाठबळ मिळाले, महिला भगिनींना घरात मान सन्मान मिळू लागला. आता हीच योजना बंद करण्याचा चंग महाविकास आघाडीवाल्यांनी बांधला आहे. पण कुणीही कितीही प्रयत्न केले तरीही ही योजना बंद पडू देणार नाही, उलट त्यात वाढ करू असे यावेळी नमूद केले. आम्ही हफ्ते घेणारे नसून तुमच्या खात्यात पैसे देणारे आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. एकीकडे महाविकास आघाडी सरकारची अडीच वर्षे आणि एकीकडे आमची दोन वर्षे यातील कामे काढून पहा म्हणजे दूध का दूध और पानी का पानी झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार

राज्यातील महायुती सरकारने सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती योजना, अन्नपूर्णा योजना, साडेसात एचपी पर्यंत वीजबिल माफ करण्याची योजना, वयोश्री योजना, तीर्थ दर्शन योजना अशा विविध लोकोपयोगी योजना राबवल्या आहेत. मात्र काही मंडळींनी या योजनांची चौकशी करून त्या बंद करण्याची घोषणा केली आहे, तसेच ती राबवणाऱ्यांना जेलमध्ये टाकण्याचा पण प्रयत्न केला आहे. मात्र, सर्वसामान्य लोकांसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार असल्याचे मत यासमयी व्यक्त केले. या सभेला नागरिकांचा मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता महेश शिंदे प्रचंड बहुमताने विजयी होतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला. कोविड कळात एकनाथ शिंदे पीपीई किट घालून फिरत होता, शंभूराजे हा कार्यसम्राट आमदार आपण निवडून दिला. जेव्हा आम्ही उठाव केला तेव्हा माझ्या पुढे  दोन पाऊले शंभूराजे होता, त्यामुळे मी दोन जिल्ह्याचं पालकमंत्रिपद शंभुराजेंना दिल्याचं एकनाथ शिदेंनी म्हटलं. यावेळी, राज्य सरकारने राबवविलेल्या योजनांबाबतही मुख्यमंत्र्‍यांनी माहिती दिली. तसेच, लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करताना लाडकी बहीण योजनेसाठी मी तरुंगातही जायला तयार असल्याचे शिंदेंनी म्हटले. 

हेही वाचा

निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Shinde Satara Speech : खरी शिवसनेना कुणाची हे सिद्ध झालंय, मुख्यमंत्र्यांचं साताऱ्यात जोरदार भाषणBhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
Embed widget