IPL 2022, GT vs CSK : आज गुजरात विरुद्ध चेन्नई मैदानात; कधी, कुठे पाहाल सामना?
IPL 2022 : आज आयपीएलमध्ये पंजाब विरुद्ध हैदराबाद यांच्यातील लढतीनंतर चेन्नई आणि गुजरात आमने-सामने उतरणार आहेत.
GT vs CSK : आज आयपीएलमधील (IPL 2022) दुसरा सामना हा आयपीएल इतिहासातील एक बलाढ्य संघ असणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध नव्याने सामिल झालेल्या गुजरात टायटन्स (CSK vs GT) यांच्यात पार पडणार आहे. यंदा चेन्नई संघाने सलग चार सामने गमावल्यानंतर अखेर पाचवा सामना जिंकला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून पुनरागमनाची अपेक्षा चाहत्यांना आहे. दुसरीकडे गुजरात संघ नव्याने स्पर्धेत सामिल झाला असला तरी त्यांची कामगिरी जबरदस्त आहे. त्यांनी पाच पैकी चार सामने जिंकले आहेत. तर एकच सामना गमावला आहे. दोन्ही संघाचा आजचा सहावा सामना आहे.
आयपीएलमध्ये (IPL 2022) आज होणाऱ्या गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपरकिंग्सकिंग्स (GT vs CSK) या सामन्याकडे चेन्नई चाहत्यांचे खास लक्ष असेल. कारण एकीकडे मुंबईचा संघ लागोपाठ सामने पराभूत होत असताना चेन्नईने देखील एकच सामना जिंकला आहे. दरम्यान आज त्यांचा सामना होणाऱ्या गुजरातचा फॉर्मही चांगला असल्याने चेन्नई आजही जिंकणार की पुन्हा पराभवाची मालिका सुरु होणार हे पाहावे लागेल. तर आजचा हा सामना कधी आणि कुठे पाहू शकता, याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
कधी आहे सामना?
आज 17 एप्रिल रोजी होणारा गुजरात आणि चेन्नई यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 7 वाजता नाणेफेक होईल.
कुठे आहे सामना?
हा सामना पुण्यातील एमसीए स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
कुठे पाहता येणार सामना?
गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल.
हे देखील वाचा-
- MI vs LSG, Top 10 Key Points : मुंबईचा पराभवांचा 'षटकार', लखनौचा 18 धावांनी विजय, सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर
- Andre Russell: पुन्हा आंद्रे रसलचं एका धावानं अर्धशतक हुकलं! त्याच्यासोबत किती वेळा असं घडलं? आकडा आश्चर्यचकीत करणारा
- Who Is Yash Dayal: पदार्पणाच्या सामन्यात गाजवलं मैदान! कोण आहे यश दयाल? ज्याच्यासमोर राजस्थानच्या फलंदाजांनी टेकले गुडघे