एक्स्प्लोर

विधीमंडळातील मंत्री आणि आमदारांनाच शिस्त लावण्याची गरज? नियमांचे सर्रास उल्लंघन; पोलिसांचा गोपनिय अहवाल अध्यक्षांकडे सुपूर्द

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात अध्यक्षांनी घातलेले नियम मंत्री आणि आमदार पायदळी तुडवत असल्याचे समोर आले आहे.विधीमंडळ सुरक्षा पोलिसांनी नियमांचे उल्लंघन सदस्यांचा गोपनिय अहवाल अध्यक्षांकडे सुपूर्द केलाय.

नागपूरविधीमंडळातील मंत्री आणि आमदारांना शिस्त लावण्याची गरज आहे का? असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. कारण गेल्या पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand padalkar)  समर्थकांमध्ये 'फ्री स्टाईल' हाणामारी झाल्यानंतर विधीमंडळातील एकूणचं सुरक्षेवर बोट ठेवण्यात आले होते. या घटनेनंतर आमदार मंत्री यांच्यासोबत येणाऱ्या विनापास व्यक्तींना न सोडण्याचा निर्णयही अध्यक्षांनी घेतला होता. मात्र, नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात (Maharashtra Winter Session 2025) अध्यक्षांनी घातलेले हे नियम मंत्री आणि आमदारच पायदळी तुडवत असल्याचे समोर आले आहे. विधीमंडळ सुरक्षा पोलिसांनी नियमांचे उल्लंघन सदस्यांचा गोपनिय अहवाल अध्यक्षांकडे सुपूर्द केलाय.

नियमांचे उल्लंघन, सदस्यांचा गोपनिय अहवाल अध्यक्षांकडे सुपूर्द

नागपूर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधीमंडळातील 15 सदस्यांनी आपल्यासोबत असलेल्या व्यक्तीला विनापास अधिवेशात प्रवेश दिला. विनापास प्रवेश देणार 3 सदस्य हे विधान परिषदेतील सत्ताधारी आमदार होते. तर 12 सदस्य हे विधानसभेचे असून या मधे एक कॅबिनेट मंत्र्याचा देखील समावेश आहे. विधान परिषद सदस्य परिणय फुके, योगेश टिळेकर यांनी आपल्यासोबत पास नसलेल्या व्यक्तीना आत आणले आहे. तसा अहवाल विधीमंडळ सुरक्षा पोलिसांकडून अध्यक्ष आणि सभापतींना दिला. तर सभापती राम शिंदेंनी हा अहवाल सभागृहात वाचून पहिल्याच दिवशी नाराजी नोंदवली आहे.

पहिल्याच दिवशी विधीमंडळातील 15 तर दुसऱ्या दिवशी 8 सदस्यांकडून सोबतच्यांना विनापास प्रवेश

मात्र, अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही 8 सदस्यांनी आपल्यासोबत आलेल्या व्यक्तीकडे पास नसताना त्यांना विधीमंडळात प्रवेश दिला. यात आमदार राजू कोरमोरे सोबत 1 व्यक्ती, प्रकाश सुर्वेंसोबत 2 व्यक्ती, महेश शिंदे सोबत 1 व्यक्ती, प्रवीण तायडेसोबत 1 व्यक्ती, किशोर जोरगेवार यांच्यासोबत 1 व्यक्ती, सिद्धार्थ खरातसोबत 1 व्यक्ती आणि मंत्री अशोक उईकेसोबत 1 व्यक्तींनी विना पास विधीमंडळात प्रवेश केला. याबाबतचा गोपनिय अहवाल विधीमंडळ सुरक्षेच्या पोलिसांनी अध्यक्षांकडे सुपूर्द केला आहे. यावरून विधीमंडळातील सदस्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने घातलेल नियम हे सदस्य विशेषता मंत्रीच पायदळी तुडवत असल्याने या मंत्री व आमदारांना शिस्त लावणे गरजेची असल्याचे म्हटले जाते.

हेही वाचा

त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं

About the author सुरज सावंत

सुरज सावंत हे जवळपास 10 वर्षांपासून माध्यमात कार्यरत आहेत. राजकारण, क्राईम यावर त्यांचा विशेष पकड आहे.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chandrapur :  चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
'ठेवलाच आहे विश्वास, तर पूर्णच ठेवून बघा' रोहित पाटलांनी वचननामा मांडत सांगली झेडपी पंचायत समितीसाठी शड्डू ठोकला
'ठेवलाच आहे विश्वास, तर पूर्णच ठेवून बघा' रोहित पाटलांनी वचननामा मांडत सांगली झेडपी पंचायत समितीसाठी शड्डू ठोकला
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, तीन सहकारी बँकांना आर्थिक दंड, महाराष्ट्रातील दोन बँकांचा समावेश 
रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, तीन सहकारी बँकांना आर्थिक दंड, महाराष्ट्रातील दोन बँकांचा समावेश 
Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प भारतावर टॅरिफवर टॅरिफ लादत सुटले, मात्र भारतामध्ये स्वतःच्या मालकीचा किती हजार कोटीचा व्यवसाय विस्तारला?
डोनाल्ड ट्रम्प भारतावर टॅरिफवर टॅरिफ लादत सुटले, मात्र भारतामध्ये स्वतःच्या मालकीचा किती हजार कोटीचा व्यवसाय विस्तारला?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Rohit Patil ZP Election : ZP साठी शड्डू ठोकला; रोहित पाटील म्हणाले, आधी लगीन कोंढाण्याचं...
The court grants relief to Chhagan Bhujbal : महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळ यांना मोठा दिलासा
Pune Viral Appa : अप्पाचा विषय लय हार्ड है, सोशल मीडियावर धुमाकळू घालणारे आजोबा 'माझा'वर
Atul Londhe Congress : आमचा दावोसला विरोध नाही, पण मॅग्नेटिक महाराष्ट्रचं काय झालं? महायुतीला सवाल
Badlapur Crime : बदलापूर पुन्हा हादरलं, शाळेच्या बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur :  चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
'ठेवलाच आहे विश्वास, तर पूर्णच ठेवून बघा' रोहित पाटलांनी वचननामा मांडत सांगली झेडपी पंचायत समितीसाठी शड्डू ठोकला
'ठेवलाच आहे विश्वास, तर पूर्णच ठेवून बघा' रोहित पाटलांनी वचननामा मांडत सांगली झेडपी पंचायत समितीसाठी शड्डू ठोकला
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, तीन सहकारी बँकांना आर्थिक दंड, महाराष्ट्रातील दोन बँकांचा समावेश 
रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, तीन सहकारी बँकांना आर्थिक दंड, महाराष्ट्रातील दोन बँकांचा समावेश 
Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प भारतावर टॅरिफवर टॅरिफ लादत सुटले, मात्र भारतामध्ये स्वतःच्या मालकीचा किती हजार कोटीचा व्यवसाय विस्तारला?
डोनाल्ड ट्रम्प भारतावर टॅरिफवर टॅरिफ लादत सुटले, मात्र भारतामध्ये स्वतःच्या मालकीचा किती हजार कोटीचा व्यवसाय विस्तारला?
T20 World Cup 2026 : टी 20 वर्ल्ड कपवर बहिष्कार बांगलादेशला महागात पडणार, 240 कोटींवर पाणी सोडावं लागणार
टी 20 वर्ल्ड कपवर बहिष्कार बांगलादेशला महागात पडणार, 240 कोटींवर पाणी सोडावं लागणार
Chhagan Bhujbal: महाराष्ट्र सदन घोटाळ्यात एसीबीनंतर आता ईडीच्या केसमध्येही छगन भुजबळ सहीसलामत सुटले; निर्दोष मुक्ततेचा अर्ज कोर्टाकडून मंजूर
महाराष्ट्र सदन घोटाळ्यात एसीबीनंतर आता ईडीच्या केसमध्येही छगन भुजबळ सहीसलामत सुटले; निर्दोष मुक्ततेचा अर्ज कोर्टाकडून मंजूर
Sinhgad Institute Crisis: पुण्यात सिंहगड इन्स्टिट्यूटमधील कर्मचाऱ्यांचे तब्बल सोळा महिन्यापासून पगार थकले; कर्मचाऱ्यांचे बेमुदत कामबंद आंदोलन
पुण्यात सिंहगड इन्स्टिट्यूटमधील कर्मचाऱ्यांचे तब्बल सोळा महिन्यापासून पगार थकले; कर्मचाऱ्यांचे बेमुदत कामबंद आंदोलन
T20 World Cup: बांगलादेशनं वर्ल्डकपला नकारघंटा दिली, आता पाकिस्तानचा माजी कॅप्टन स्वत:च्याच क्रिकेट बोर्डाला चॅलेंज करत म्हणाला, 'हिंमत असेल तर...'
बांगलादेशनं वर्ल्डकपला नकारघंटा दिली, आता पाकिस्तानचा माजी कॅप्टन स्वत:च्याच क्रिकेट बोर्डाला चॅलेंज करत म्हणाला, 'हिंमत असेल तर...'
Embed widget