एक्स्प्लोर

Leopard attack Ganesh Naik: बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी सरकार जंगलात 1 कोटींच्या शेळ्या-बकऱ्या सोडणार, काही बिबटे आफ्रिकेला पाठवण्याचा प्रस्ताव: गणेश नाईक

Leopard attack in Maharashtra: गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि नाशिक जिल्ह्यात बिबट्यांच्या हल्ल्यात काही लोकांचा जीव गेला आहे. अलिबागच्या नागावमध्येही बिबट्याची दहशत.

Leopard attack Ganesh Naik: राज्यभरात अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये माणसांवर बिबट्यांचे हल्ले वाढल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर आता महायुती सरकारकडून बिबट्यांनी (Leopard attack) खाण्याच्या शोधात जंगलाबाहेर (Forest) येऊ नये, यासाठी जंगलातच शेळ्या किंवा बकऱ्या (Goats) सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकृतरित्या या निर्णयावर मंजुरीची मोहोर उमटली नसली तरी पुण्यातील काही भागांमध्ये बिबट्यांना खाण्यासाठी शेळ्या किंवा बकऱ्या सोडण्यात आल्या आहेत, अशी माहिती राज्याचे वनमंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी दिली. ते मंगळवारी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Maharashtra Leopard attack)

बिबट्यांच्या मानवी वस्तीतील वाढत्या हल्ल्यांविषयी वनमंत्री गणेश नाईक यांना विचारणा करण्यात आली. यावर प्रतिक्रिया देताना गणेश नाईक यांनी म्हटले की, हिंस्त्र प्राण्यांना जे भक्ष्य पाहिजे ते भक्ष्य जंगलात उपलब्ध राहिलेले नाही. प्रत्येक जिल्ह्यामध्ये बिबट्यांना खाण्यासाठी शेळ्या किंवा बकऱ्या गळ्यात टॅग घालून सोडण्याचा आमचा विचार आहे. जसा प्रत्येक गावात एक नंदी असतो, तशाचप्रकारे या शेळ्या-बकऱ्या असतील. तुमच्या मुलाबाळांना आणि कुटुंबाच्या सदस्यांना बिबट्याचा धोका होऊ नये म्हणून काही ठिकाणी वनखात्याने या शेळ्या सोडल्या आहेत. त्यांचं रक्षण तुम्ही करा, असे आवाहन गणेश नाईक यांनी नागरिकांना केले.
 
बिबट्या हा पूर्वी वन्यजीव होता. आता तो ऊसातील जीव झाला आहे. जंगलापेक्षा ऊसाच्या फडात बिबट्यांची पैदास होत आहे. त्यामुळे बिबट्यांची संख्या वाढली आहे. बिबट्या हा शेड्यूल 1 मध्ये येणारा प्राणी आहे. त्याचा समावेश आता शेड्यूल 2 मध्ये करण्यात यावा, यासाठी आम्ही केंद्रीय वनखात्याला प्रस्ताव पाठवला आहे. बिबटे जंगलात नसतील तर त्यांची गणना वन्यजीव म्हणून करु नये, असेही आम्ही वनाखात्याला सांगितले आहे. तुर्तास बिबट्यांची काहीप्रमाणात नसबंदी करण्याची परवानगी आम्हाला केंद्रीय वनखात्याकडून मिळाली आहे. राज्य सरकारकडून प्रत्येक जंगलात बिबटे सम प्रमाणात राहावेत, यादृष्टीने नियोजन केले जात आहे. बिबट्यांना जंगलातच भक्ष्य मिळावे. त्यांनी गावात येऊन कुत्रे आणि माणसांवर हल्ले करु नयेत, यासाठी वनखात्याकडून प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी जंगलात शेळ्या सोडण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. जुन्नर, आंबेगाव, शिरुर तालुक्यात तशी सुरुवातही झाली आहे, असेही गणेश नाईक यांनी म्हटले.

Ganesh Naik news: महाराष्ट्रातील बिबटे आफ्रिकेला आणि वनताराला पाठवणार: गणेश नाईक

राज्यातील ज्या भागांमध्ये जास्त बिबटे आहेत, तेथील बिबटे आफ्रिकेला पाठवण्यासंदर्भातही विचार सुरु असल्याचे गणेश नाईक यांनी सांगितले. आफ्रिकेमध्ये वाघ, सिंह आहेत, पण तिकडे बिबटे नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रातील बिबटे आफ्रिकेला पाठवण्याची मागणी केली तर त्याचा विचार कराल का, अशी विचारणा आम्ही केंद्रीय वनखात्याला केली आहे. त्यांनी आम्हाला लेखी प्रस्ताव पाठवण्यास सांगितले आहे. काही बिबटे वनताराला पाठवले जातील, असे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.

आणखी वाचा

बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना सरकारी नोकरी देणार? वन विभाग मोठ्या निर्णयाच्या तयारीत

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde: मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदेंनी दोन वेळा उत्तर दिलं, म्हणाले मुंबईचा महापौर....
हॉटेलमध्ये नगरसेवक का ठेवले? शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? म्हणत एकनाथ शिंदेंनी कारण सांगून टाकलं
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Manikarnika Ghat Special Report : मणिकर्णिका घाट पाडला, काँग्रेसची जहीर टीका, पुनर्विकासावरुन वादाची ठिणगी
Devendra Fadnavis Davos : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर, मोठी गुंतवणूक येणार
BJP And Congress Politics : भाजपात कुरघोडीचे वार, काँग्रेसमध्ये संघर्षाला धार Special Report
Pune NCP Cross Voting : घरभेदीची खेळी, भाजपनं भाजली पोळी? Special Report
Sharad Pawar And Ajit Pawar Alliance : दादा-काकांची एकी? जिल्हा परिषद 'घड्याळ' चिन्हावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde: मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदेंनी दोन वेळा उत्तर दिलं, म्हणाले मुंबईचा महापौर....
हॉटेलमध्ये नगरसेवक का ठेवले? शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? म्हणत एकनाथ शिंदेंनी कारण सांगून टाकलं
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार
सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप
सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप
Video: एकनाथ शिंदेंकडून अडीच वर्षे महापौरपदाची मागणी; भाजपची पहिली प्रतिक्रिया, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Video: एकनाथ शिंदेंकडून अडीच वर्षे महापौरपदाची मागणी; भाजपची पहिली प्रतिक्रिया, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपच्या 84 मध्ये पाचने वाढ, त्यात 35 बाहेरून आलेले 37 अमराठी आणि 10-12 आमदार खासदारांच्या नात्यागोत्यातील; सुषमा अंधारेंनी मुंबईतील भाजप नगरसेवकांची कुंडलीच मांडली
भाजपच्या 84 मध्ये पाचने वाढ, त्यात 35 बाहेरून आलेले 37 अमराठी आणि 10-12 आमदार खासदारांच्या नात्यागोत्यातील; सुषमा अंधारेंनी मुंबईतील भाजप नगरसेवकांची कुंडलीच मांडली
Embed widget