Devendra Fadnavis & Eknath Shinde: देवेंद्र फडणवीस सभागृहातील बिग डी, आरडओरडा न करता विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करतात: एकनाथ शिंदे
Devendra Fadnavis & Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांची स्तुृती केली. गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही नेत्यांमध्ये तणाव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.

Devendra Fadnavis & Eknath Shinde: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सावजीसारखे तिखट आणि नागपुरी संत्र्यासारखे गोड आहेत. जराही चिडचिड न करता देवेंद्र फडणवीस अंगावर येणाऱ्या विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करतात, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात एकमेकांच्या पक्षाचे कार्यकर्ते फोडण्यावरुन वितुष्ट निर्माण झाल्याच्या चर्चा आहेत. या सगळ्यामुळे एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन अमित शाहांकडे (Amit Shah) महाराष्ट्र भाजपची तक्रारही केल्याचे सांगितले जात होते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी नागपूरमध्ये झालेल्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. काल देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभेतील भाषणाच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. (Maharashtra Politics news)
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हसतखेळत विरोधकांना चीतपट करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. ती त्यांनी अनेकदा दाखवली आहे. टीका, ट्रोलिंग, टेन्शन, टोमणे सहन करण्याची त्यांची क्षमता अफाट आहे. देवेंद्रजींनी कधीही या टीकेला उत्तर दिले नाही आणि आरडाओरड किंवा आदळाआपट त्यांनी कधी केली नाही. ज्यांना उत्तर द्यायचं असेल त्यांना ते बरोबर उत्तर देतात. अंगावर आलेल्या विरोधकांचा करेक्ट कार्यक्रमही ते करतात. अमिताभ बच्चन हे बॉलीवूडमधील बिग बी असतील तर देवेंद्र फडणवीस सभागृहातील बिग डी आहेत. हा डी म्हणजे डिव्होशन, डेडिकेशन, डेरिंग, डिसिप्लिनचा आणि डिटरमेशनचा आहे. 2022 साली मी जेव्हा आम्ही निर्णायक पाऊल उचलायचं ठरवलं तेव्हा खंबीर पाठिंबा देणारा त्यांच्यातील सच्चा दोस्तही मी पाहिलेला आहे. त्यावेळी अनेकदा ते मला हुडी घालून भेटायला यायचे. त्यांच्या या हुडीने विरोधकांना हुडहुडी भरली होती. 'मी यारो का यार, दुश्मनो का दुश्मन आहे', हे त्यांनी अनेकदा दाखवलंय, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी स्वपक्षीय आमदारांचे कान टोचले
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी रात्री देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या आमदारांचे कान टोचले. सभागृहाच्या कामात जास्तीत जास्त सहभागी व्हा. कामकाज समजून घेत जा. मंत्र्यांनीही कुठे बाहेर जाण्याऐवजी सभागृहात बसून राहिले पाहिजे. आमदारांनी चर्चेत सहभागी झाले पाहिजे, असा सल्ला एकनाथ शिंदे यांनी आमदारांना दिला.
आणखी वाचा























