एक्स्प्लोर

Who Is Yash Dayal: पदार्पणाच्या सामन्यात गाजवलं मैदान! कोण आहे यश दयाल? ज्याच्यासमोर राजस्थानच्या फलंदाजांनी टेकले गुडघे

Who Is Yash Dayal: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात अनेक नव्या चेहऱ्यांनी दमदार कामगिरीच्या जोरावर आपली छाप सोडली आहे.

Who Is Yash Dayal: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात अनेक नव्या चेहऱ्यांनी दमदार कामगिरीच्या जोरावर आपली छाप सोडली आहे. दरम्यान, तिलक वर्मा, आयुष बदोनी, अभिनव मनोहर, वैभव अरोडा यांच्यासारख्या या युवा खेळाडूंनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या यादीत गुजरात टायटन्सचा युवा गोलंदाज यश दयाल याच्या नावाचाही समावेश झालाय. त्यानं राजस्थानविरुद्ध पदार्पणाच्या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करत राजस्थानच्या विजयाचा पाया रचला. ज्यामुळं सोशल मीडियावर त्याच्या नावाची चर्चा रंगली आहे. तर, यश दयाल कोण आहे? त्याचा आयपीएलपर्यंतचा प्रवास कसा होता? हे जाणून घेऊयात.

गुजरातचा डावखुरा वेगवान गोलंदाजानं राजस्थानविरुद्ध सामन्यातून आयपीएलमध्ये पदापर्ण केलं. या सामन्यात त्यानं राजस्थानच्या तीन फलंदाजांना माघारी धाडलं. त्यानं सर्वात पहिलं राजस्थानचा सलामीवीर देवदत्त पडिकलला आऊट केलं. त्यानंतर रासी व्हेन आणि युजवेंद्र चहलला आपल्या जाळ्यात अडकवलं. 

वयाच्या आठव्या वर्षी क्रिकेटमध्ये करिअर घडवायचं ठरवलं
यश दयालचा जन्म 13 डिसेंबर 1997 रोजी प्रयागराज येथे झाला. तो आपलं राज्य उत्तर प्रदेशसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळतो. त्याच्याबद्दल आणि त्याच्या खेळीबद्दल खूप कमी लोकांना माहिती असेल. वेस्ट इंडीजविरुद्ध खेळण्यात आलेल्या एकदिवसीय मालिकेत तो भारतीय संघाच्या बायो बबलचा भाग होता. यश दयालनं आठ वर्षातचं क्रिकेटमध्ये करिअर घडवायचं ठरवलं होतं. यशनं भारतीय संघासाठी क्रिकेट खेळावं,असं त्याच्या वडिलांचं स्वप्न होतं. यश दयालचे वडीलही त्यावेळी गोलंदाजी करायचे. परंतु, कुटुंबियाची आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यानं त्यांना क्रिकेट सोडवं लागलं. 

यश दयालला खरेदी करण्यासाठी बंगळुरू, कोलकातानं उत्सुकता दाखवली 
आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये गुजरात टायटन्सनं त्याला 3 कोटीत खरेदी केलं होतं. त्याची मूळ किंमत 20 लाख होती. ऑक्शनमध्ये त्याला आपल्या संघात सामील करण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्सनंही उस्तुकता दाखवली होती.

यश दयालची कारकिर्द
24 वर्षीय यश दयालने सप्टेंबर 2018 मध्ये विजय हजारे ट्रॉफीमध्ये यूपीसाठी लिस्ट-अ मध्ये पदार्पण केलं. त्याच वर्षी या युवा खेळाडूनं रणजी करंडकातून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. यानंतर यश दयाल फेब्रुवारी 2019 मध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीद्वारे यूपीसाठी टी-20 पदार्पण करण्यात यशस्वी झाला.

राजस्थानविरुद्ध गुजरातचा 37 धावांनी विजय
आयपीएल 2022 च्या 24 व्या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या गुजरातनं 20 षटकांत चार विकेट्स गमावून राजस्थान रॉयल्ससमोर 193 धावांचं लक्ष्य ठेवलं. संघाच्या वतीनं कर्णधार हार्दिक आणि अभिनव मनोहर यांच्यात 55 चेंडूत 86 धावांची शानदार भागीदारी केली. राजस्थानला पराभूत करून गुजरातच्या संघानं गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेत आहेत. 

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Doctor Sejal Pawar Controversial Comment In Pranit More Show: KEM ची डॉक्टर तरुणी, मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्ट्सवर नको ते बरळली; कधीकाळी दोन प्रसिद्ध क्रिकेटर्सची होती गर्लफ्रेंड? 'ते' चॅट्स व्हायरल
KEM ची डॉक्टर तरुणी, मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्ट्सवर नको ते बरळली; कधीकाळी दोन प्रसिद्ध क्रिकेटर्सची होती गर्लफ्रेंड? 'ते' चॅट्स व्हायरल
Vaibhav Sooryavanshi India A : वैभव सूर्यवंशी श्रीलंकेत पोहोचला; टीम इंडिया A चा पहिला सामना कधी, कुठे अन् कोणत्या संघाविरुद्ध? LIVE कुठे पाहता येणार? जाणून घ्या A टू Z
वैभव सूर्यवंशी श्रीलंकेत पोहोचला; टीम इंडिया A चा पहिला सामना कधी, कुठे अन् कोणत्या संघाविरुद्ध? LIVE कुठे पाहता येणार? जाणून घ्या A टू Z
Michael Clarke Car Accident : गाडीत झोपला होता वर्ल्डकप विजेता कर्णधार, ट्रकखाली घुसली कार अन्...; पुढे जे घडलं ते हादरवणारं
गाडीत झोपला होता वर्ल्डकप विजेता कर्णधार, ट्रकखाली घुसली कार अन्...; पुढे जे घडलं ते हादरवणारं
Rishabh Pant : उपकर्णधारपद गेल्यानं रिषभ पंत नाराज? टीम इंडियाच्या सहायक प्रशिक्षकानं मौन सोडलं, फलंदाजीवर सल्ला देत म्हणाले... 
उपकर्णधारपद गेल्यानं रिषभ पंत नाराज? टीम इंडियाच्या फलंदाजी प्रशिक्षकानं मौन सोडलं, नेमकं काय म्हटलं?

व्हिडीओ

Jalgaon MLC Election Special Report : नाशकातील बंडखोरी मिटली, पण जळगावचा पेच कायम! शिवसेनेच्या रेश्मा काळे 'नॉट रिचेबल'!
Finance Ministry Special Report:अर्थखातं राष्ट्रवादीला मिळणार? मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा अर्थ काय?
Sunetra Pawar Speech NCP Vardhapan Din : कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही; स्वकीयांना इशारा
Chhagan Bhujbal Speech NCP Vardhapan Din 2026 : तटकरेंच्या टोमण्यांना उत्तर, रोखठोख भुजबळ UNCUT
Sunil Tatkare Speech NCP Vardhapan Din 2026 : राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी भुजबळांना तुफान टोले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dr. Sejal Pawar : डॉ. सेजल पवारच्या अडचणीत वाढ, के.ई.एम. कडून मोठी कारवाई, 15 दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवलं पण टांगती तलवार कायम
डॉ. सेजल पवारच्या अडचणीत वाढ, के.ई.एम. कडून मोठी कारवाई, 15 दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवलं पण टांगती तलवार कायम
MNS On Jain Community White Line Controversy Mumbai Road: पांढऱ्या पट्ट्यांवर काळा रंग मारणार; मनसेचा 3 वाजेपर्यंत अल्टिमेटम, BMC चे अधिकारी थिनर घेऊन पोहोचले, दादरमध्ये राडा!
पांढऱ्या पट्ट्यांवर काळा रंग मारणार; मनसेचा 3 वाजेपर्यंत अल्टिमेटम, BMC चे अधिकारी थिनर घेऊन पोहोचले, दादरमध्ये राडा!
धक्कादायक! पोलीस ठाण्यातच 'सैराट'; मुलगी प्रियकरासोबत पळून गेली, समुपदेशन करताना वडिलांकडूनच हल्ला
धक्कादायक! पोलीस ठाण्यातच 'सैराट'; मुलगी प्रियकरासोबत पळून गेली, समुपदेशन करताना वडिलांकडूनच हल्ला
Pune Crime News: 'क्राइम पेट्रोल' पाहून बनला सराईत चेन स्नॅचर, पोलिसांनी फिल्मी स्टाईलने सापळा रचला अन्...; पुण्यात अशा आवळल्या चोराच्या मुसक्या
'क्राइम पेट्रोल' पाहून बनला सराईत चेन स्नॅचर, पोलिसांनी फिल्मी स्टाईलने सापळा रचला अन्...; पुण्यात अशा आवळल्या चोराच्या मुसक्या
जैन समाजाने बांगड्या भरल्या नाहीत; मनसेच्या संदीप देशपांडेंवर निलेश चंद्र मुनींचा पलटवार, जैन बांधवांनाही आवाहन
जैन समाजाने बांगड्या भरल्या नाहीत; मनसेच्या संदीप देशपांडेंवर निलेश चंद्र मुनींचा पलटवार, जैन बांधवांनाही आवाहन
Shreyas Iyer News : कर्णधार होताच श्रेयस अय्यरने मुंबईतील वरळीत घेतला आलिशान फ्लॅट; भाडं ऐकून तुम्हीही व्हाल थक्क
कर्णधार होताच श्रेयस अय्यरने मुंबईतील वरळीत घेतला आलिशान फ्लॅट; भाडं ऐकून तुम्हीही व्हाल थक्क
PM Kisan E-KYC : 30 जूनपर्यंत PM किसानची ई केवायसी करा, अन्यथा पैसे बंद, 23 व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांना कधी मिळणार?
30 जूनपर्यंत PM किसानची ई केवायसी करा, अन्यथा पैसे बंद, 23 व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांना कधी मिळणार?
Ambadas Danve : ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंचा संपर्कात असल्याचा चर्चेला अंबादास दानवेंचा दुजोरा; म्हणाले, 'आता हे अधिकृत कबूल करायला हवं...'
ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंचा संपर्कात असल्याचा चर्चेला अंबादास दानवेंचा दुजोरा; म्हणाले, 'आता हे अधिकृत कबूल करायला हवं...'
Embed widget