एक्स्प्लोर

MI vs LSG, Top 10 Key Points : मुंबईचा पराभवांचा 'षटकार', लखनौचा 18 धावांनी विजय, सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर

MI vs LSG, Highlights, IPL 2022 : मुंबई इंडियन्स विरद्ध लखनौ सुपरजायंट्स (MI vs LSG) सामन्यात लखनौने 18 धावांनी मुंबईवर विजय मिळवला आहे.

MI vs LSG, IPL 2022 : आयपीएलच्या आजच्या सामन्यात लखनौचा कर्णधार केएल राहुलच्या दमदार शतकामुळे मुंबईसमोर त्यांनी 200 धावांचे आव्हान ठेवले. हे पूर्ण करताना मुंबईचे सर्वच फलंदाज स्वस्तात माघारी परतत होते. सूर्यकुमार आणि तिलक वर्मा यांनी काहीसा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनाही खास कमाल दाखवता आली नाही. अखेरच्या काही षटकात पोलार्ड क्रिजवर होता पण तोही मुंबईला विजय मिळवून देऊ शकला नाही आणि 18 धावांनी मुंबईचा पराभूत झाला. तर या सामन्यातील महत्त्वाच्या 10 मुद्द्यांवर एक नजर फिरवू...

MI vs LSG 10 महत्त्वाचे मुद्दे-

  1. सामन्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाणेफेक. नाणेफेक जिंकणारा संघ सामनाही जिंकतो असंच समीकरण झालं आहे. पण आज मुंबईने प्रथम गोलंदाजी घेऊनही त्यांना पराभव पत्करावा लागला. याचे कारण लखनौचा दमदार खेळ ठरला. 
  2. सामन्याबद्दल बोलायचं झालं तर पाहता क्षणी समोर येणारी गोष्ट म्हणजे केएल राहुलचं दमदार शतक. मुंबईची प्रथम गोलंदाजी असताना देखील राहुलने ठोकलेल्या शतकामुळे मुंबईसमोर 200 धावांचे लक्ष्य होते. राहुलने 60 चेंडूत 9 चौकार आणि 5 षटकार ठोकत नाबाद 103 धावा केल्या.
  3. सामन्यात राहुलने डि कॉकसह चांगली सुरुवात केली. पण डि कॉक बाद होताच संघावर प्रेशर आलं. पण याचवेळी राहुलसोबत मयांकने एक उत्तम भागिदारी रचली. ही भागिदारी संघासाठी महत्त्वाची ठरली.
  4. मुंबईकडून गोलंदाजीत खास कामगिरी झाली नसून आज एक महत्त्वाची गोष्ट पाहायला मिळाली, ती म्हणजे मोठ्या प्रमाणात झालेली मिसफिल्ड.
  5. मुंबईचे गोलंदाज खराब कामगिरी करतच होते. त्यात मुंबईने मोठ्या विश्वासाने संघात घेतलेल्या इंग्लंडच्या टायमल मिल्सच्या गोलंदाजीवर आज तुफान फटकेबाजी झाली. त्याला तीन षटकात 54 धावा आल्या.
  6. केवळ बुमरहाने 24 चेंडूत 24 धावा देत दिल्या. विकेट्सचा विचार करता उनडकटने दोन, मुरगन आणि फेबियन एलनने प्रत्येकी एक विकेट घेतली.
  7. त्यानंतर दुसऱ्या इनिंगचा विचार करता, 200 धावांचे आव्हान पार करताना मुंबईचे सलामीवीर आजही फेल झाले. रोहित सहा तर ईशान 13 धावाच करु शकला.
  8. संघ अडचणीत असताना तिलक आणि सूर्यकुमारने एक चांगली भागिदारी रचली. पण ते संघाला विजयापर्यंत घेऊन जाऊ शकले नाहीत. तिलक 26 आणि त्यानंतर सूर्यकुमार 37 धावा करुन तंबूत परतला
  9. अखेरच्या काही षटकात पोलार्डने विजय मिळवून देण्यासाठी संपूर्ण प्रयत्न केले. पण त्याची 25 धावांची खेळी मुंबईला विजय मिळवून देऊ शकली नाही.
  10. सामन्यात मुंबईची फलंदाजी तर सुमार पाहायला मिळालीच, पण गोलंदाजीमधील अडचणी पुन्हा दिसून आल्या. बुमराहच्या जोडीला एकही चांगल्या फॉर्ममधील गोलंदाज नसल्याने आज मुंबई पराभूत झाली असे म्हणता येईल.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

परभणीत मुलींच्या जन्माचं अनोखं स्वागत, सोने अन् चांदीचं नाणं भेट, 7  मातांना दोन किलो जिलेबीचंही वाटप
परभणीत मुलींच्या जन्माचं अनोखं स्वागत, सोने अन् चांदीचं नाणं भेट, 7 मातांना दोन किलो जिलेबीचंही वाटप
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
Nitish Kumar : भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांचं वक्तव्य अन् नितीशकुमारांची शांतता, बिहारच्या राजकारणात नेमकं काय घडणार? राजदची भूमिका काय असणार?
नितीशकुमारांच्या शांततेतून राजकीय वादळाचे संकेत की आणखी काही? एनडीए सोडणं जदयूला सोपं आहे का?
पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही; सत्काराच्या भाषणात अब्दुल सत्तांरांनी सगळंच काढलं
पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही; सत्काराच्या भाषणात अब्दुल सत्तांरांनी सगळंच काढलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षातील नक्की नातं काय?Nagpur Crime : पोटच्या मुलाने केली आई-वडिलांची हत्या, पोलिसांनी फोडलं बिंगSpecial Report on Mohan Bhagwat : कुंभमेळ्यात भागवतांविरोधात आखाडा? संघात काडी टाकण्याचा प्रयत्न?Special Report Asha Pawar:पवार कुटुंबात बदल होणार,अजितदादांच्या मातोश्रींची छोटी सी आशा पूर्ण होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
परभणीत मुलींच्या जन्माचं अनोखं स्वागत, सोने अन् चांदीचं नाणं भेट, 7  मातांना दोन किलो जिलेबीचंही वाटप
परभणीत मुलींच्या जन्माचं अनोखं स्वागत, सोने अन् चांदीचं नाणं भेट, 7 मातांना दोन किलो जिलेबीचंही वाटप
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
Nitish Kumar : भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांचं वक्तव्य अन् नितीशकुमारांची शांतता, बिहारच्या राजकारणात नेमकं काय घडणार? राजदची भूमिका काय असणार?
नितीशकुमारांच्या शांततेतून राजकीय वादळाचे संकेत की आणखी काही? एनडीए सोडणं जदयूला सोपं आहे का?
पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही; सत्काराच्या भाषणात अब्दुल सत्तांरांनी सगळंच काढलं
पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही; सत्काराच्या भाषणात अब्दुल सत्तांरांनी सगळंच काढलं
Shirdi News : नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सर्वसामान्य भाविकाला थेट आरतीचा मान, साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न
नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सर्वसामान्य भाविकाला थेट आरतीचा मान, साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न
Adani Group News: तामिळानाडू सरकारकडून स्मार्ट मीटर प्रकल्पाचं टेंडर रद्द, अदानी ग्रुपच्या कंपनीनं लावलेली सर्वात कमी दरावर बोली 
तामिळानाडू सरकारकडून स्मार्ट मीटर प्रकल्पाचं टेंडर रद्द, अदानी ग्रुपच्या कंपनीनं लावलेली सर्वात कमी दरावर बोली
राजन साळवी शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार?; उद्धव ठाकरेंसोबत फोनवर चर्चा, दोन दिवसांत निर्णय
राजन साळवी शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार?; उद्धव ठाकरेंसोबत फोनवर चर्चा, दोन दिवसांत निर्णय
अभिनेता एजाज खानकडून दोघांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; 31 डिसेंबरच्या 2 घटना, पोलिसांकडून दखल
अभिनेता एजाज खानकडून दोघांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; 31 डिसेंबरच्या 2 घटना, पोलिसांकडून दखल
Embed widget