Dream 11 IPL 2020 Sponsors | यंदाच्या आयपीएलचं टायटल स्पॉन्सर ड्रीम इलेव्हनकडे
Dream 11 IPL 2020 Title Sponsors : आयपीएल 2020 साठी चायनिज कंपनी VIVO ऐवजी नव्या टायटल स्पॉन्सरची घोषणा करण्यात आली आहे. यंदाच्या आयपीएलचं टायटल स्पॉन्सर ड्रीम इलेव्हनकडे असणार आहे.
नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग (IPL)च्या 13व्या सीझनसाठी नवा टायटल स्पॉन्सर (IPL Sponsor)ची घोषणा करण्यात आली आहे. ड्रिम इलेव्हन यंदाच्या सीझनचं टायटल स्पॉन्सर असणार आहे. VIVO ला 13व्या हंगामाच्या टायटल स्पॉन्सवरून हटवल्यानंतर Dream 11 यंदा आयपीएलचं टायटल स्पॉन्सर असणार आहे.
आयपीएलचे प्रमुख आयोजक बनण्याच्या शर्यतीत अनअॅकॅडमी, टाटा आणि बायजूस हेदेखील होते. अनअॅकॅडमीने 210 कोटी, टाटाने 180 कोटी आणि बायजूसने 125 कोटींची बोली लावली होती. ड्रीम इलेव्हनने 250 कोटींची बोली लावून आयपीएलचं टायटल स्पॉन्सर आपल्या नावे केलं आहे.
आधी आयपीएलचं टायटल स्पॉन्सर VIVO कडे होतं. परंतु, भारत आणि चीनमध्ये वाढत्या तणावामुळे BCCI ने विवोकडून सर्व अधिकार काढून घेतले होते. विवोने 2018 ते 2022 पर्यंत म्हणजेच, पाच वर्षांसाठी 2190 कोटी रुपये बीसीसीआयला देत आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरचे सर्व अधिकार स्वतःकडे घेतले होते.
Dream11 wins IPL 2020 title sponsorship for Rs 222 crores: IPL Chairman Brijesh Patel
— ANI (@ANI) August 18, 2020
दरम्यान, यावेळी बीसीसीआय समोर टायटल स्पॉन्सर सोधण्याचं आव्हान उभं ठाकलं होतं. बीसीसीआयने भारत आणि चीनमध्ये झालेल्या तणावानंतर वीवोला टायटल स्पॉन्सर म्हणून हटवण्याचा निर्णय घेतला होता. बीसीसीआयला वीवो दरवर्षी टायटल स्पॉन्सर म्हणून 440 कोटी रुपये देत होतं. वीवोने बीसीसीआयसोबत 2022 पर्यंत कॉन्ट्रॅक्ट केलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या :
- दुबईत इतक्या दिवसांसाठी खेळाडू राहणार क्वॉरंटाईन; BCCI च्या निर्णयावर सर्व संघांची संमती
- चीनला आणखी एक झटका, आयपीएलमध्ये VIVO स्पॉन्सर नाही
- IPL 2020 | मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये रंगणार आयपीएलचा पहिला सामना; एका क्लिकमध्ये संपूर्ण शेड्यूल
- IPL 2020 | क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी, 19 सप्टेंबरपासून IPL ची सुरुवात
- कोरोनामुळे टी-20 वर्ल्ड कप यावर्षी होणार नाही, आयपीएलचा मार्ग मोकळा
- IPL 2020 | आयपीएलच्या 13 व्या सीजनचं दुबईत होणार आयोजन