(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2020 | आयपीएलच्या 13 व्या सीजनचं दुबईत होणार आयोजन
ऑस्ट्रेलियात ऑक्टोबरमध्ये पार पडल्या जाणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपचं आयोजन आयसीसीने पुढे ढकललं आहे. आयसीसीच्या या निर्णयानंतर बीसीसीआयसाठी आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन करण्यासाठीचा रस्ता मोकळा झाला आहे.
मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 13 व्या सीजनची वाट पाहणाऱ्या क्रिकेट प्रेमींसाठी खूश खबर आहे. आयपीएलच्या तेराव्या सीजनचं आयोजन दुबई येथे होणार आहे. बीसीसीआयने दुबईत आयोजन करण्यासाठी सरकारकडे परवानगी मागितली आहे. आयपीएलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी याबाबत माहिती दिली. मात्र आयपीएलच्या आयोजनाबाबतच्या इतर गोष्टींचा निर्णय आयपीएलच्या गव्हर्निंग काऊंसिलच्या बैठकीत होणार आहे. या बैठकीचं आयोजन पुढील 7 ते 10 दिवसांमध्ये होणार आहे.
ब्रिजेश पटेल यांनी म्हटलं आहे की,
मात्र आयपीएलबाबत अद्याप काही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. याबाबत ब्रिजेश पटेल म्हणाले की,
कोरोनामुळे टी-20 वर्ल्ड कप यावर्षी होणार नाही, आयपीएलचा मार्ग मोकळा
ऑस्ट्रेलियात ऑक्टोबरमध्ये पार पडल्या जाणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपचं आयोजन आयसीसीने पुढे ढकललं आहे. आयसीसीच्या या निर्णयानंतर बीसीसीआयसाठी आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन करण्यासाठीचा रस्ता मोकळा झाला आहे. करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे टी-20 विश्वचषकाचं आयोजन पुढे ढकलण्यात आलं आहे. आयपीएलच्या आयोजनासाठी बीसीसीआयने तयारी सुरु केली होती. मात्र वर्ल्ड कपमुळे काही ठोस निर्णय घेतला नव्हता. मात्र आयसीसीने टी-20 वर्ल्ड कप पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आणि बीसीसीआयचा मार्ग मोकळा झाला.