एक्स्प्लोर

IPL 2020 | क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी, 19 सप्टेंबरपासून IPL ची सुरुवात

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2020) च्या तेराव्या सिझनची वाट पाहणाऱ्या क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी. यंदाची आयपीएल 19 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरातमध्ये सुरु होणार आहे.

  नवी दिल्ली: इंडियन प्रीमियर लीग (IPL 2020) च्या तेराव्या सिझनची वाट पाहणाऱ्या क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी. यंदाची आयपीएल 19 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमीरातमध्ये सुरु होणार आहे. तर आयपीएलची फायनल आठ नोव्हेंबरला होणार असल्याची माहिती आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिली आहे.. स्पर्धेच्या आयोजनात कोणताही बदल करण्यात आलेला नसून, बीसीसीआयने सर्व संघमालकांना याबद्दल प्राथमिक कल्पना देऊन ठेवलेली असल्याची देखील माहिती आहे. आयपीएल व्यवस्थापन परिषदेची बैठक पुढील आठवड्यात होणार आहे, या बैठकीत आयपीएलबाबत अंतिम रुपरेषा ठरणार आहे. माहिती अशीही मिळाली आहे की, बीसीसीआयने आपल्या निर्णयाबाबत फ्रेंचायजींना देखील माहिती दिली आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं होतं की, पूर्ण शक्यता आहे की, आयपीएल 19 सप्टेंबरपासून सुरु होईल आणि 8 नोव्हेंबरला फायनल खेळवली जाईल. यानुसार आयपीएल 13 सिझनचं हे आयोजन 51 दिवसांचं असेल. लवकरच येणार वेळापत्रक  आयपीएलची तारीख ठरली असली तरी अजून किती सामने होणार आणि कुठे होणार याबाबतचं वेळापत्रक मात्र तयार झालेलं नाही. एका आठवड्याच्या आत आयपीएलचं वेळापत्रक येण्याची शक्यता आहे. आयपीएलकडून हे शेड्यूल लवकरच जाहीर होऊ शकतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) ने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारा टी20 विश्वचषक स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएलचा हा 13 वा हंगाम 26 सप्टेंबरपासून सुरु होईल असं सांगितलं जात होतं, मात्र आता एक आठवडा आधीच सुरु होऊ शकतं, कारण त्यानंतर टीम इंडियाचा आस्ट्रेलिया दौरा होणार आहे. अधिकाऱ्यानं सांगितलं की, भारतीय संघाला आस्ट्रेलिया सरकारच्या नियमानुसार त्या दौऱ्यात 14 दिवस क्वारंटाईन राहावं लागणार आहे. कोरोनामुळे टी-20 वर्ल्ड कप यावर्षी होणार नाही, आयपीएलचा मार्ग मोकळा कोरोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर इंटरनॅशनल क्रिकेट काऊन्सिलने (ICC) यावर्षी ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर महिन्यात होणारा टी-20 वर्ल्ड कप रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आता टी-20 वर्ल्ड कप पुढच्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. आयसीसीच्या बोर्ड मीटिंगमध्ये वर्ल्ड कप टाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वर्ल्ड कप पुढे ढकलल्यामुळे इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या सीजनचा रस्ता मोकळा झाला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून वर्ल्ड कपचं आयोजन यावर्षी होणार नाही, असे अंदाज बांधले जात होते. वर्ल्ड कपचं आयोजन करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने काही दिवसांपूर्वीच यावर्षी वर्ल्ड कपसाठी तयार नसल्याचं म्हटलं होतं. गेल्या काही दिवसांमध्ये ऑस्ट्रेलियात कोरोनाचा व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. यामुळे सप्टेंबरच्या शेवटापर्यंत ऑस्ट्रेलियाने आपल्या सीमाही सील केल्या आहेत. IPL 2020 | आयपीएलच्या 13 व्या सीजनचं दुबईत होणार आयोजन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Embed widget