Zero Hour : जाना था अर्जुनी मोरगाव, पहुंच गये आरमोरी, पायलटच्या चुकीचा फटका
Zero Hour : जाना था अर्जुनी मोरगाव, पहुंच गये आरमोरी, पायलटच्या चुकीचा फटका
जेव्हा हेलिकॉप्टर उडवणारा पायलटच चुकीची लँडिंग करतो आणि काँग्रेस नेते सचिन पायलट चुकीच्या जिल्ह्यात पोहोचतात... आडनाव पायलट आणि विमानाची दिशा चुकत असेल तर तुम्ही त्याला काय म्हणणार... होय असंच घडलंय काँग्रेस नेते सचिन पायलट यांच्यासोबत... दोन दिवसांपूर्वी सचिन पायलट विदर्भात काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी आले होते.. नागपुरातून सचिन पायलट हेलिकॉप्टरने गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनीसाठी निघाले... मात्र वैमानिकाच्या चुकीमुळे ते गोंदिया जिल्ह्यात लँड होण्याऐवजी गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी मध्ये लँड झाले... योगायोगाने आरमोरी मध्ये त्याच वेळेस काँग्रेसने ते कन्हैया कुमार हेलिपॅड वर येणे अपेक्षित होते... त्यामुळे आरमोरी मधील काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांच्या स्वागतासाठी तिथे तैनात होते.. हेलिकॉप्टर मधून अचानक कन्हैया कुमार यांच्या ऐवजी सचिन पायलट समोर आल्याने आरमोरी मधील काँग्रेस नेते ही चकित झाले... उतरल्यावर सचिन पायलट आणि त्यांच्या वैमानिकाला आपण वेगळ्याच ठिकाणी लँड झाल्याची चूक लक्षात आली... सचिन पायलट यांनी आरमोरी मधील काँग्रेस नेत्यांशी बातचीत केली आणि तिथून ते गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनीसाठी रवाना झाले... चुकीच्या लँडिंग च्या या घटनेमुळे सचिन पायलट मोरगाव अर्जुनी च्या सभेत सुमारे तीन तास उशिरा पोहोचले... आणि पायलट यांच्या सभेला सुरुवात होऊ शकली...