एक्स्प्लोर
Advertisement
आयसीसीच्या कसोटी रॅकिंगमध्ये अजिंक्य रहाणे एकमेव भारतीय
दुबई: आयसीसीच्या कसोटी क्रिकेटच्या रॅकिंगमध्ये भारताचा स्टार फलंदाज अजिंक्य रहाणेच्या क्रमवारीत सुधारणा झाली असून, त्याने आता टॉप 10च्या क्रमवारीत धडक मारली आहे. तर अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत रविचंद्रन अश्विनने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.
रहाणेने वेस्ट इंडिजमध्ये सुरु असलेल्या कसोटी क्रिकेटच्या मालिकेत उत्तम कामगिरी केली आहे. त्याने तीन सामन्यात मिळून 233 धावा बनवल्या.
आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेटच्या रॅकिंगमध्ये रहाणे आठव्या स्थानी असून टॉप 10च्या यादीतील तो एकमेव भारतीय आहे. या यादीतील ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ अव्वल स्थानी आहे. भारताचा कसोटी क्रिकेटचा कर्णधार विराट कोहलीची या यादीत १३ व्या स्थानावरून १६ व्या स्थानावर घसरण झाली आहे. गोलंदाजांच्या यादीत अश्विन दुसऱ्या तर रवींद्र जडेजा सहाव्या स्थानी आहे. तर जिम्मी अॅडरसनने अव्वल स्थानी आहे.
अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अश्विनने अव्वल स्थान कायम राखले असून दुसऱ्या स्थानी बांग्लादेशचा शाकिब अल हसन आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रीडा
मुंबई
Advertisement