एक्स्प्लोर
IND vs WI 3rd T20 भारत विरूद्ध वेस्ट इंडिज निर्णायक सामना; गोलंदाजांच्या कामगिरीवर लक्ष
भारत विरूद्ध वेस्ट इंडिज निर्णायक सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. विंडीजनं दुसरा ट्वेन्टी ट्वेन्टी सामना जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.
मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज संघांमधला तिसरा आणि अखेरचा ट्वेन्टी ट्वेन्टी सामना आज (बुधवारी) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. विंडीजनं दुसरा ट्वेन्टी ट्वेन्टी सामना जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. त्यामुळं यजमान टीम इंडियाच्या दृष्टीनं तिसऱ्या सामन्यासह मालिका जिंकणं प्रतिष्ठेची बाब ठरली आहे. भारतीय क्षेत्ररक्षकांची पहिल्या दोन्ही सामन्यांमधली ढिलाई ही टीम इंडियाच्या दृष्टीनं चिंतेची बाब ठरली आहे. किंबहुना भारतीय क्षेत्ररक्षकांनी सोडलेल्या झेलांमुळंच टीम इंडियाला दुसरा ट्वेन्टी ट्वेन्टी सामना गमवावा लागला होता.
भारत आणि वेस्ट इंडिज संघांमधील दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाची पडली बाजू ही क्षेत्ररक्षणामध्ये दिसून आली. दोन्ही सामन्यांमध्ये भारतातील अनेक खेळाडूंनी झेल सोडले होते. दुसऱ्या सामन्यात विराटने हे स्पष्ट सांगितलं होतं की, अशाप्रकारच्या क्षेत्ररक्षणामुळे कोणतंही लक्ष्य गाठणं अशक्यचं. सध्या सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी असल्यामुळे तिसरा आणि अंतिम सामना निर्णायक ठरणार आहे.
तसेच भारतीय संघासाठी आणखी एक चिंतेचा विषय म्हणजे, गोलंदाजी. कारण मागील दोन सामन्यांमध्ये कोणत्याही गोलंदाजाने फारशी प्रभावी कामगिरी केलेली नाही. पहिल्या सामन्यात विंडीजनं 207 धावांच आव्हान भारतीय संघासमोर ठेवलं होतं आणि दुसऱ्या सामन्यातही 171 धावांचं लक्ष्य गाठणही फारसं कठिण ठरलं नव्हतं. शेवटच्या सामन्यात कर्णधार विराट कोहली आपल्या संघात बदल करू शकतो, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. कसोटी सामन्यांमध्ये दमदार कामगिरी करणारा भारतीय संघाचा गोलंदाज मोहम्मद शमीला ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. अंतिम सामन्यात मात्र शमीची वर्णी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, पहिल्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात रोहित शर्मालाही फारशी कामगिरी करता आली नाही. त्यानंतर लोकेश राहुल आणि विराट कोहलीने संघाची धुरा सांभाळली. परंतु, दुसऱ्या सामन्यात मात्र रिषभ पंत आणि शिवम दुबे हे दोन फलंदाज वगळता इतर कोणत्याही फलंदाजाची जादू चालली नाही. आधीच्या दोन सामन्यात फारशी कामगिरी करू न शकलेला रोहित आता घरच्या मैदानावर खेळणार असल्यामुळे त्याच्याकडून अनेक क्रिकेटप्रेमींना अपेक्षा आहेत. ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यासाठी संघ : भारतीय टी-20 टीम : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, संजू सॅमसन, ऋषभ पंत (विकेटकीपर), मनीष पांडे, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी. वेस्ट इंडीज टी-20 टीम : केरन पोलार्ड (कर्णधार), फेबियन एलन, शेल्डन कॉटरेल, शिमरन हेटमायेर, जेसन होल्डर, ब्रेंडन किंग, एविन लुइस, कीमो पॉल, निकोलस पूरन, खारी पीएरे, दिनेश रामदीन, शेरफाने रदरफोर्ड, लेंडल सिमंस, हेडन वॉल्श जूनियर, किसरिक विलियम्स. संबंधित बातम्या : Ind vs WI 2nd T20 | वेस्ट इंडिजचा टीम इंडियावर आठ विकेट्सनी दणदणीत विजय, मालिकेत 1-1 अशी बरोबरी IND VS WI 1st T20 - भारताचा दणदणीत विजय, विराटच्या नाबाद 94 धावा IND vs WI 2nd T20 | विराटचा सीमारेषेवर अफलातून झेल पाहून सगळेच थक्क! MS Dhoni | महेंद्रसिंह धोनी संघात कमबॅक कधी करणार? रवी शास्त्री म्हणातात... केसरिक विलियम्सचं कोहलीला प्रत्युत्तर; ट्विटरवर फॅन्सची अशी रिअॅक्शनLooking confident, @ImRo45 ahead of the decider in Mumbai💪#TeamIndia #INDvWI @Paytm pic.twitter.com/4UpRQ1V0W9
— BCCI (@BCCI) December 10, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement