एक्स्प्लोर
केसरिक विलियम्सचं कोहलीला प्रत्युत्तर; ट्विटरवर फॅन्सची अशी रिअॅक्शन
शुक्रवारी खेळण्यात आलेल्या पहिल्या टी20 सामन्यात विलियम्स गोलंदाजी करत असताना कोहलीने जबरदस्त खेळी खेळत त्याच्याच अंदाजात नोटबुक सेलिब्रेशन केलं. परंतु, दुसऱ्या सामन्यात विलियम्सने कोहलीला बाद करत, प्रत्युत्तर दिलं. आता फॅन्स ट्विटरवर आपली रिअॅक्शन देत आहेत.
मुंबई : हैदराबाद टी20 मधील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात संघाचा कर्णधार विराट कोहलीचा मोलाचा वाटा होता. याच सामन्यात वेस्ट इंडिजच्या गोलंदाजाला त्याच्याच स्टाइलमध्ये विराटने उत्तर दिले. विराटने दिलेल्या या उत्तरामुळे फॅन्स भलतेच खूश झाले होते. परंतु काल तिरुअनंतपुरमच्या दुसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टीत सामन्यात अगदी उलट गोष्ट पाहायला मिळाली.
वेस्ट इंडिजच्या ज्या गोलंदाजाला विराटने उत्तर दिले होतं, त्यानेच विराटला बाद केलं. स्टेडिअममध्ये एकच गोंधळ सुरु झाला. पण विलियम्सने आपल्या तोंडावर बोट ठेवून सगळ्यांना शांत राहायला सांगितलं. त्यामुळे विलियम्सने विराटला आपल्या हटके अंदाजात पुन्हा एकदा प्रत्युत्तर दिल्याची चर्चा फॅन्समध्ये रंगली आहे.🤫#INDvWI pic.twitter.com/0fv5CHLMDs
— ICC (@ICC) December 8, 2019
विलियम्सने टाकलेल्या चेंडूवर विराट बाद झाला. विराटने 17 चेंडूंमध्ये 19 धावा केल्या आणि 14 व्या ओव्हरमध्ये बाद झाला. शुक्रवारी खेळण्यात आलेल्या पहिल्या टी20 सामन्यात विलियम्स गोलंदाजी करत असताना कोहलीने जबरदस्त खेळी खेळत त्याच्याच अंदाजात नोटबुक सेलिब्रेशन केलं. परंतु, दुसऱ्या सामन्यात विलियम्सने कोहलीला बाद करत, प्रत्युत्तर दिलं. आता फॅन्स ट्विटरवर आपली रिअॅक्शन देत आहेत.2017: Kesrick Williams gives a send off to Virat Kohli with a 'tick in the notebook' celebration
2019: Kohli smacks Williams all round the park & did the same 8th Dec 2019 : Kesrick Williams silences the crowd😘❤❤ pic.twitter.com/MnCVOd9oRT — Mr HaMzA (@MrHaMzA54) December 8, 2019
दरम्यान, लेंडल सिमन्सच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर वेस्ट इंडिजनं तिरुअनंतपुरमच्या दुसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टीत टीम इंडियावर आठ विकेट्सनी दणदणीत विजय साजरा केला. या सामन्यात भारतानं विंडीजसमोर 171 धावांचं आव्हान ठेवलं होतं. विंडीजनं हे आव्हान नऊ चेंडू आणि आठ विकेट्स राखून पार केलं.Watch: Virat Kohli celebrates with Kesrick Williams' own notebook celebration to 'tick' his name off it during IND vs WI pic.twitter.com/DuUKdARZit
— The Youth Magazine (@theyouthmag_) December 7, 2019
सलामीच्या लेंडल सिमन्सनं सलामीला येत 45 चेंडूत नाबाद 67 धावांची खेळी केली. त्यानं एविन लुईससह पहिल्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी रचून विंडीजच्या विजयाचा पाय रचला. लुईसनं 40 धावांचं योगदान दिलं. या विजयासह विंडीजनं तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. संबंधित बातम्या : IND vs WI 2nd T20 | विराटचा सीमारेषेवर अफलातून झेल पाहून सगळेच थक्क! Ind vs WI 2nd T20 | वेस्ट इंडिजचा टीम इंडियावर आठ विकेट्सनी दणदणीत विजय, मालिकेत 1-1 अशी बरोबरी IND VS WI 1st T20 - भारताचा दणदणीत विजय, विराटच्या नाबाद 94 धावाKesrick has smartly given Kohli a taste of his own medicine with that sushing celebration.#INDvWI pic.twitter.com/tb1xFkGERw
— Suneer (@suneerchowdhary) December 8, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement